नांदेड - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून केल्याची घटना मंगळवारी गणपूर ( ता . अर्धापूर ) येथे घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे.
गाढ झोपेत असताना केला खून...!
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गणपूर येथील गोदावरी काशिनाथ आढाव ( वय 45 ) यांच्या चारित्र्यावर त्यांचे पती काशिनाथ संभाजी आढाव ( वय 55 ) हे नेहमी संशय घेत असत. यातून त्यांच्यात अनेकवेळा वाद होत असे. यातच काशिनाथ याने आपल्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पत्नी गोदावरी गाढ झोपेत असतांना तिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून केला.
अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....!
श्रीकांत आढाव यांच्या फिर्यादीवरुन पती विरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अर्धापूर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी ( ग्रामिण ) बाळासाहेब देशमुख, अर्धापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, फौजदार कपील आगलावे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. तपास पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे करित आहेत.