नांदेड Prakash Ambedkar : राहुल नार्वेकरांनी एवढ्या कालावधीतच निर्णय द्यावा, असं सांगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. (MLA disqualification issue) नार्वेकरांची काय अडचण या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दात मला वकीलपत्र दिलं नाही. (OBC meeting Narsi ) राजकीय बाजू काय आहे हे तपासायचं असेल तर त्यांनी मला कागदपत्र, वकीलपत्र द्यावे तरच मी त्यांची बाजू मांडू शकेल. भाजपाला विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या घ्यायच्या नाहीत. भाजपाचे सर्व लक्ष लोकसभेवरच आहे. भाजपा जाणून बुजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया नोंदवली.
सुप्रीम कोर्टाला 'हा' अधिकार नाही: सुप्रीम कोर्टाने निवडणुकीला स्टे ऑर्डर केला हे बेकायदेशीर आहे. कुठल्याही निवडणुका थांबवता येत नाहीत. सुप्रीम कोर्टात घटना तोडवत आहे, अशी असणारी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. सुप्रीम कोर्टाला निवडणूक थांबवण्याचा अधिकार नाही. निवडणूक झाल्यानंतर निवडणूक वैध की अवैध हे ठरवण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टानंही स्वतः आपल्या अखत्यारीत राहावं, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहे या अशी प्रतिक्रिया दिली. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया नोंदवली. संजय राऊत यांनी भूमिका मांडावी की किती उद्योग बाहेर गेले? सध्या लूट चालू आहे, या वक्तव्यावर काय लुटलं आणि किती लुटलं हेही राऊत त्यांनी स्पष्ट करावं, असं ते बोलले.
मविआच्या नेत्याशी चर्चा नाही: सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्याची प्रमुख भूमिका सर्वांत आधी मीच मांडल्याच्या दावा आंबेडकर यांनी केलाय. यानंतर सर्वांनी टिमकी वाजवायला सुरुवात केली, असेही यावेळी ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीच्या सोबत यावं अशी इच्छा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेस पार्टीची भूमिका असेल तर मी विचार करेल अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया नोंदवत त्यांनी जाहीर करावं आम्हाला आनंदच आहे. आम्ही सर्वजण स्वागत करू. वंचित बहुजन आघाडीनं बारा-बारा जागांचा फार्मूला सादर केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कुठल्याच नेत्याशी आपली चर्चा झाली नसल्याची माहितीसुद्धा आंबेडकर यांनी दिली.
हेही वाचा: