नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. नांदेडमध्ये एक कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर नाकाबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी नांदेड पोलीस विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे.
नांदेड-लातूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस खडा पहारा देत आहेत. अत्यावश्यक सेवा व लॉकडाऊनच्या काळातील सेवा असलेल्या वाहनांनाच फक्त जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील माळेगाव येथे ही नाकाबंदी असून, या रस्त्यावरील येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी पोलीसांकडून करण्यात येत आहे.