नांदेड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6 डिसेंबर) मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. आदिलाबाद-नांदेड-मुंबई ही विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून सांगण्यात आली.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंसह या ६ जणांचा होणार शपथविधी
वेळापत्रक पुढीलप्रमाणे -
गाडी क्रमांक ०७०५८ ही रेल्वे ५ डिसेंबर रोजी आदिलाबाद येथून सकाळी ७ वाजता सुटेल व किनवट, भोकर मार्गे नांदेड येथे ११ वाजता पोहोचेल. नांदेड येथून सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी निघेल व परभणी, जालना, औरंगाबाद मार्गे दादर येथे ६ डिसेंबरला सकाळी ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७०५७ ही रेल्वे ७ डिसेंबर रोजी मध्य रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी दादर येथून निघेल आणि मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे नांदेड येथे दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. नांदेड येथून १ वाजून ३० मिनिटांनी निघेल आणि आदिलाबाद येथे सायंकाळी ६ वाजता पोहोचेल.
हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा