नांदेड - पत्नी सासरी नांदण्यास येत नव्हती. आपल्या पत्नीला सासूच नांदवायला पाठवत नसल्याचा संशय जावयाला होता. याच रागातून जावयाने सासूच्या डोक्यात दगडी जाते मारून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील तरोडा भागातील भावसार नगरात घडली. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालिनी भायेकर असे मृत सासूचे तर श्रीकांत पाडदेवाड असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मालिनी विजयकुमार भायेकर (वय ५६ ) या तरोडा खुर्द भागातील भावसार नगरात राहतात. त्यांची मुलगी मोहिनी हिचा सहा वर्षापूर्वी श्रीकांत शंकरराव पाडदेवाड याच्यासोबत आंतरजातीय विवाह झाला. मोहिनी लातूरला एका खासगी बँकेत तर श्रीकांत तिथेच लातूरला एका हॉस्टेलवर वार्डन म्हणून काम करत होता. विवाहनंतर या दोघांमध्ये वाद होत असल्याने मोहिनी माहेरी आली होती. त्यानंतर श्रीकांत तिला परत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, सासू मालिनी मोहिनीला नांदायला पाठविण्यास तयार नव्हती.
दगडी जाते मारून केला खून
आपल्या पत्नीला नांदायला न लावण्यास सासू मालिनी जबाबदार आहे, असा संशय शंकर याला होता. रविवारी रात्री मालिनी घरी एकट्या असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर श्रीकांतने सासूचे घर गाठले. तेथे गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यावेळी श्रीकांतने सासूच्या डोक्यात जाते मारून खून केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या खोलीत जाऊन श्रीकांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी मोहिनी नातेवाईकांकडे गेली असल्याने ती बचावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
भाग्यनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तेथे पोहोचून त्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी चक्रधर विजयकुमार भायेकर ( वय ३२ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडात पत्नी नांदायला येत नसल्याने सासूचा खून करुन जावईची आत्महत्या - नांदेड पोलीस बातमी
मोहिनी हिचा सहा वर्षापूर्वी श्रीकांत शंकरराव पाडदेवाड याच्यासोबत आंतरजातीय विवाह झाला. मोहिनी लातूरला एका खासगी बँकेत तर श्रीकांत तिथेच लातूरला एका हॉस्टेलवर वार्डन म्हणून काम करत होता. विवाहनंतर या दोघांमध्ये वाद होत असल्याने मोहिनी माहेरी आली होती. त्यानंतर श्रीकांत तिला परत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, सासू मालिनी मोहिनीला नांदायला पाठविण्यास तयार नव्हती.