नांदेड : यंदा आषाढी एकादशी २९ जून रोजी येत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरला जात असतात. मराठवाड्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने जात असतात. तेव्हा भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे विभागाने पंढरपूरसाठी सहा विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष रेल्वे जालना-पंढरपूर, पंढरपूर-नांदेड, छत्रपती संभाजीनगर-पंढरपूर-छत्रपती संभाजीनगर, आदिलाबाद – पंढरपूर – आदिलाबाद दरम्यान चालवल्या जाणार आहेत. या विशेष रेल्वेमध्ये फर्स्ट एसी, एसी व्दितीय- टियर, एसी तृतीय -टियर, स्लीपर आणि जनरल सिटिंग सारख्या वेगवेगळे कोच जोडण्यात आले आहेत.
सहा विशेष रेल्वे : जालना-पंढरपूर(०७५११) ही रेल्वे २७ जून रोजी रात्री ७.२० वाजता जालना स्थानकावरून निघून दुसऱ्या दिवशी २८ जून रोजी सकाळी ७.३० वाजता पंढरपूर स्थानकावर पोहचेल. पंढरपूर-हजूर साहिब नांदेड (०७५१२) ही रेल्वे २८ जून रोजी नांदेड स्थानकावरून सकाळी ८.१५ वाजता निघून रात्री साडे आठ वाजता पंढरपूर येथे पोहचेल. छत्रपती संभाजीनगर -पंढरपूर (०७५१५) ही रेल्वे २८ जून रोजी रात्री ९.४० वाजता छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून निघून २९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता पंढरपूर येथे पोहचेल. पंढरपूर-छत्रपती संभाजीनगर (०७५१६) ही रेल्वे २९ जून रोजी पंढरपूर स्थानकावरून रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास निघून ३० जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी एक ४५ वाजता पोहोचेल. आदिलाबाद-पंढरपूर (०७५०१) ही रेल्वे २८ जून रोजी आदिलाबाद स्थानकावरून सकाळी ११ वाजता निघून २९ जून रोजी सकाळी ९.२० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
भाविकांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूर-आदिलाबाद (०७५०४) ही रेल्वे २९ जून रोजी पंढरपूर स्थानकावरून ९.५० वाजता निघून ३० जून रोजी आदिलाबाद स्थानकावर ८.४५ वाजता पोहोचेल. तसेच जालना-पंढरपूर (०७५११) व छत्रपती संभाजीनगर -पंढरपूर (०७५१५/०७५१६) ही विशेष रेल्वे जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्सी टाऊन आणि कुर्डुवाडी स्थानकावर थांबेल. तर आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद विशेष रेल्वे (०७५०१/०७५०४) किनवट, बोधडी, धानोरा, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा जंक्शन, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, तंदूर येथे थांबतील. सेदाम, चित्तापूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर आणि कुरुडवाडी जंक्शन येथे दोन्ही दिशांना थांबेल. तसेच पंढरपूर - नांदेड (०७५१२) ही विशेष रेल्वे कुरुडवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा स्थानकावरही थांबेल.
हेही वाचा :