ETV Bharat / state

नांदेड : आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा गोळीबार; आरोपी ताब्यात

आरोपीच्या शोधात वजिराबाद पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी माळटेकडी भागात गेले होते. माळटेकडी परीसरात दुचाकीवर पळून जाणाऱ्या आरोपींनी पोलीस पथकालाच खंजरचा धाक दाखविला असता पोलिसांनी आरोपींच्या दिशेने गोळीबार केला.

nanded Shooting police person
nanded Shooting police person
author img

By

Published : Jul 27, 2021, 7:16 PM IST

Updated : Jul 27, 2021, 7:33 PM IST

नांदेड - जुन्या नांदेड शहरातील रहिवासी असलेल्या एका ऑटोचालकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीच्या शोधात वजिराबाद पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी माळटेकडी भागात गेले होते. माळटेकडी परीसरात दुचाकीवर पळून जाणाऱ्या आरोपींनी पोलीस पथकालाच खंजरचा धाक दाखविला असता पोलिसांनी आरोपींच्या दिशेने गोळीबार केला. यात एकजण जखमी झाला असून आरोपीला ताब्यात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी ताब्यात

पोलिसांना मिळाली होती माहिती -

७ जुलै रोजी जमीर बेग या रिक्षा चालकाला गंभीर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. ही घटना चिखलवाडी कॉर्नर भागात घडली होती. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली होती. मंगळवारी वजिराबाद पोलिसांचे एक पथक माळटेकडी भागात आरोपीचा शोध घेण्यासाठी गेले होते. एका घरात आरोपी सोनुसिंग उर्फ सोनु राजेंद्रसिंग चव्हाण व त्याच्यासोबत एक अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यादरम्यान, पोलीस आणि आरोपींमध्ये झटापटही झाली. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एक जण जखमी झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा - ETV EXPLAINER : पोर्नोग्राफी आणि इरोटीकमध्ये काय फरक आहे?

Last Updated : Jul 27, 2021, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.