ETV Bharat / state

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी - नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण न्यूज

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, परीक्षेसाठी लागणारे संदर्भ, पुस्तके, मार्गदर्शक उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी देण्याचा निर्णय झाला. या वेळी, विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

Breaking News
author img

By

Published : Sep 19, 2020, 7:03 PM IST

नांदेड - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, परीक्षेसाठी लागणारे संदर्भ, पुस्तके, मार्गदर्शक उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी देण्याचा निर्णय झाला. आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्व निर्णय घेण्यात आला.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विविध विकास कामे, कोविड-19 प्रादुर्भावामुळे खोळंबलेल्या परीक्षेबाबत आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज विद्यापीठात संपन्न झाली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना विद्यापीठामध्ये निवासाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शंभर मुलींचे शासकीय वसतीगृह, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शंभर मुलांसाठी वसतीगृह, शासकीय अध्यापक महाविद्यालयास विद्यापीठात जागा उपलब्ध करून देणे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता देणे, डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्रास मान्यता व वसतीगृह इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणे, श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्थेच्या नवीन विभागीय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली.

हेही वाचा - मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी सर्वांनी एकत्र यावे- अशोक चव्हाण

या बैठकीस कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, प्रभारी कुलगुरु डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. वसंत भोसले, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. महेश मगर, परीक्षा व मुल्यमापन मंडळाने संचालक डॉ. रवी सरोदे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. नलिनी टेंबेकर यांची उपस्थिती होती.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.