ETV Bharat / state

गोल्डन मॅन गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणी सातवा आरोपी गजाआड, आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई - Nanded Crime News

जुन्या शहराती चौफाळा येथे काँग्रेस कार्यकर्ते व गोल्डन मॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी सातव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

seventh-accused-arrested-in-golden-man-govind-kokulwar-shootings
गोल्डन मॅन गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणी सातवा आरोपी गजाआड
author img

By

Published : Dec 27, 2019, 11:37 AM IST

नांदेड - जुन्या शहरातील चौफाळा येथे काँग्रेस कार्यकर्ते व गोल्डन मॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात काँग्रेस कार्यकर्ता वीरेंद्र कानोजी याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करुन त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

गोल्डन मॅन गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणी सातवा आरोपी गजाआड

गोविंद कोकुलवार यांच्यावर ऑगस्टमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात १७६/२०१९ कलम ३०७,१२०(ब),३४ शस्त्रास्त्र कायदा कलम ३/२५, २७ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ कलम ३(१) (i), ३ (11), ३(२), ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी केली. या प्रकरणात एकूण सहा आरोपीना आतापर्यंत अटक झाली आहे. या प्रकरणाती अटक आरोपींची नावे बजरंग ऊर्फ योद्धा नरवाडे, गुरूचरणसिंघ ऊर्फ लक्की गील, सय्यद नजीदोद्दीन ऊर्फ गुड्ड सय्यद मुन्नीरोद्दीन सुभाष पवार व वीरेंद्र उर्फ सतीश कानोजी अशी आहेत. सातवा आरोपी हरदविंदरसिंघ ऊर्फ रिंदा फरार आहे.

या गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल, जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासात सातवा आरोपी वीरेंद्र ऊर्फ सतीश याचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला २५ डिसेंबरला अटक करुन त्याच्याकडून तपासासाठी एकूण ७ मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले आहेत. या आरोपीला २६ डिसेंबरला औरंगाबादच्या मोक्का विशेष न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Intro:नांदेड : गोल्डन मॅन गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणी सातवा आरोपी गजाआड, आरोपी वीरेंद्र कानोजीवर मोक्का अंतर्गत कारवाई.

नांदेड : जुन्या शहरातील चौफाळा येथे काँग्रेस कार्यकर्ते व गोल्डन मॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात काँग्रेस कार्यकर्ता वीरेंद्र कानोजी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करुन त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.Body:गोविंद कोकुलवार यांच्यावर ऑगस्टमध्ये गोळया झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गु.र.नं.१७६/२०१९ कलम ३०७,१२०(ब),३४ शस्त्रास्त्र कायदा कलम ३/२५, २७ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ कलम ३(१) (i), ३ (11), ३(२), ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेंद्र कानोजीला अटक
करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी केली.
या प्रकरणात एकूण सहा आरोपी आतापर्यंत गजाआड झाले असून त्यात बजरंग ऊर्फ योद्धा नरवाडे आंबाळा ता.हदगाव, राजू राऊत रा.बारड
ह.मु. बेलानगर, तरोडा(बु) व बरडशेवाळा ता.हदगाव,
गुरूचरणसिंघ ऊर्फ लक्की गील रा.अबचल नगर, गल्ली नं.०६, प्लॉट नंबर ०५, नांदेड, सय्यद नजीदोद्दीन ऊर्फ गुड्ड सय्यद मुन्नीरोद्दीन रा.रॉयल रोज फंक्शन हॉल जवळ, आसरा नगर,नांदेड, सुभाष पवार रा.बरडशेवाळा ता.हदगाव व वीरेंद्र उर्फ सतीश कानोजी रा.परिमल नगर भंडारीनगर नांदेड हे अटकेत आहेत. सातवा आरोपी हरदविंदरसिंघ ऊर्फ रिंदा रा. नांदेड हा फरार आहे.Conclusion:या गुन्ह्यात वापरलेली पिस्टल,जिवंत काडतूसे व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याच्या तपासात सातवा आरोपी वीरेंद्र ऊर्फ सतीश याचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास २५ डिसेंबर रोजी अटक करुन त्याच्याकडून
तपासकामी एकूण ७ मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले आहेत. सदर आरोपीला २६ डिसेंबर औरंगाबादच्या मोक्का विशेष न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.