नांदेड : महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालणार,असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी आज समाचार घेतला. फडवणीसांना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतायत, महाराष्ट्रातदेखील सत्ता परिवर्तन होईल, अशा शब्दात राऊत यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. जागा वाटपाचा आकडा आपल्याला माध्यमांकडून समजला असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले. पण त्याचवेळी राऊतांनी लोकसभेच्या जागेविषयी ठाकरे गटाच्या शिवसेनेची महत्त्वकांक्षाही सांगितली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.
कार्यक्रत्यांकडून जंगी स्वागत : शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे आजपासून नांदेड दौऱ्यावर आहेत. खासदार संजय राऊत अनेक वर्षांनी नांदेडमध्ये आल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. संजय राऊतांना पाहण्यासाठी देगलूरमध्ये प्रचंड गर्दी जमा झाली होती. यावेळी तेलंगणा सीमेवर शिवसैनिकांनी मोटारसायकल रॅली काढत त्यांचे स्वागत केले. बँड बाजा आणि फटाक्याची आतिषबाजी करत संजय राऊत यांचे स्वागत करण्यात आले.
फडणवीसांवर राऊतांची टीका : महाराष्ट्रात फक्त मोदी पॅटर्न चालेले विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला संजय राऊत यांनी नांदेडमध्ये उत्तर दिले. लोकसभा विधानसभा च्या निवडणुका महविकास आघाडी च्या व्रज मुठी खालीच लढवल्या जातील बेकायदे शिर सरकार वाले काही म्हणून आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि होणार ही नाही सध्या च्या घटना बाह्य सरकारला सते वरून खाली खेचू. फडणवीसांनी काल पुण्याच्या सभेमध्ये शरद पवार यांच्या पुस्तकातील 10 वाक्य वाचून दाखवली. त्याच पुस्तकात फडणवीस यांच्या संबंधित सुद्धा वाक्य होती तीही वाचायला हवी होती. पुण्याच्या सभेत काही पदाधिकारी झोपल्याचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत, त्यावरही चर्चा करावी. असेही संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या वाक्यावरून फडणवीस यांनी खील्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी त्यांचाच पोपट मेलाय असे वक्तव्य केले आहे.
माध्यमांकडून जागेचा आकडा समजला : लोकसभेसाठी सोळा सोळाचा फार्मूला ही बातमी मी तुमच्याकडून ऐकतोय, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जागा वाटपाचा कुठलाही फार्मूला अध्याप ठरला नसून यावर चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आता लोकसभा जागा वाटपासंदर्भात आता प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. पवार साहेबांसोबत आमती बैठक झाली त्यात बैठका कोणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या काय सूत्र असावीत, यावर नक्कीच चर्चा झाली आहे. पण अजून जागा वाटपाचा आकडा ठरलेला नाही, तुम्ही आता नवीन आकडा देत आहेत स्वागत आहे. लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका महविकास आघाडीच्या व्रजमूठ खालीच लढवल्या जातील. बेकायदेशीर सरकारवाले काही म्हणत असले तरी आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. तसेच होणारही नाही, सध्याच्या घटनाबाह्य सरकारला सत्तेवरून खाली खेचू असे राऊत म्हणालेत.
आम्हाला माहित आहे, तुम्ही जे बातमी देत आहे 16 / 16 चा फार्मूला ठरला ही बातमी चुकीची आहे. तुम्हाला कोण बातम्या देत हे माहीत नाही पण अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरला नाही - संजय राऊत
संजय राऊत यांनी माध्यमांवर चागलेच भडकले : आम्ही काय बाजारात उभे आहोत का? तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा? हे सांगत बसायला. शिवसेनेचे 19 खासदार लोकसभेत राहतील. शिवसेनेने महाराष्ट्रात 18 व दादर हवेली येथे एक जागा निवडून आले आहे, अशा 19 जागा शिवसेनेकडे कायम राहतील. लोकसभेत हा आकडा आमचा कायम राहील आमची मागणी नाही, तो आम्ही जिंकलेला आकडा आहे, तो कायम राहील. तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने एक जागा जिंकली आहे, ती त्यांच्याकडेच राहणार. ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या त्यांच्याकडेच राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
अंधारेंना मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी : सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचे अत्यंत दुर्दैवी अशी बातमी आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. पक्षामध्ये अशा प्रकारचे बेशिस्तपणा चालणार नाही. सुषमा अंधारे पक्षाच्या उपनेत्या आहेत, महाप्रबोधन यात्रा त्यांच्या नेतृत्वात होत आहे. शिवसेनेमध्ये महिलांप्रती सभ्यता पाळली जाते, दोषी पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा -
- Maharashtra Politics: अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्या कानशिलात लगावल्याची दिली कबुली; मातोश्रीवरुन पदावरून हकालपट्टीचे दिले आदेश
- Amrita Fadnavis Bribary News : अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल
- Karnataka CM : कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला ममता, नितीश, केसीआर यांना निमंत्रण