ETV Bharat / state

Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणी हत्याप्रकरणात 12 वा आरोपी अटकेत; तीन जणांवर मोक्का

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली ( Sanjay Biyani Murder Case ) आहे. तर, तीन जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई न्यायालयाने केली ( Sanjay Biyani Murder Case Mocca Three More ) आहे.

Sanjay Biyani Murder Case accused
Sanjay Biyani Murder Case accused
author img

By

Published : Jun 15, 2022, 9:44 PM IST

नांदेड - येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली ( Sanjay Biyani Murder Case ) होती. त्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला नांदेडमधून अटक केली आहे. तर, तीन आरोपींवर मोक्का अंतर्गत न्यायालयीन कोठडी सुनावली ( Sanjay Biyani Murder Case Mocca Three More )आहे.

संजय बियाणी हत्येप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली होती. त्यात आता एका आरोपीला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. रणजीत सुभाष मांजरमकर ( वय, २५ रा. पौर्णिमानगर ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रणजीत गोलू मंगनाळे याचा मित्र आहे. त्याच्या घरातून 2 अग्निशस्त्र, 57 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 20 जून पर्यंत मोक्का अंतर्गत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, तिहार जेलमधून आणलेले 2 आरोपी राजपाल सिंग चांद्रवत ( वय, 29), योगेश कैलाशचंद भाटी ( वय, 25 ) यांना सुद्धा 20 जून पर्यंत मोक्का कोठडी सुनावण्यात आली आहे.

खंडणीसाठी बियाणींची हत्या - 5 एप्रिलला संजय बियाणी याची त्यांच्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारात बियाणी गंभीर जखमी झालेले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, काही वेळात त्यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस दोन महिन्यांपासून या हत्येतील आरोपींच्या मागावर आहेत 12 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्यापही काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - Girlfriend Murder In Sangli : प्रेयसीने बर्थडे गिफ्ट म्हणून मागितली सोन्याची अंगठी, प्रियकराने काढला काटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.