ETV Bharat / state

Builder Sanjay Biyani Murder Case: बियाणी यांच्या संपत्तीवरून वाद; एका महिलेचा आक्षेप - बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी

बांधकाम व्यवसायिक संजय बियाणीच्या हत्येनंतर ( Biyani murder ) कुटुंबात कलह सुरू झाला आहे. अनिता बियाणी यांच्या तक्रारी नंतर प्रवीण बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल ( Case filed against Praveen Biyani ) झाला होता.आता संपत्तीच्या वारसदार म्हणून अनिता बियाणी ( Anita as heir of Biyani Estate ) यांनी दाखल केलेल्या दाव्यावर एक महिलेने आक्षेप ( One woman objected estates claim) घेतला आहे.

Builder Sanjay Biyani
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी
author img

By

Published : Jun 19, 2022, 9:53 AM IST

नांदेड - संजय बियाणीच्या हत्येनंतर कुटुंबात कलह ( Family feud after Sanjay Biyani's murder ) सुरू झाला आहे. अनिता बियाणी यांच्या तक्रारी नंतर प्रवीण बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल ( Case filed against Praveen Biyani ) झाला होता.आता संपत्तीच्या वारसदार म्हणून अनिता बियाणी ( Anita as heir of Biyani Estate ) यांनी दाखल केलेल्या दाव्यावर एक महिलेने आक्षेप ( One woman objected estates claim) घेतला आहे. अनिता बियाणी यांनी संपत्तीचे वारसदार म्हणून न्यालायत दावा दाखल केला होता. त्याला आता एक महिलेने आक्षेप घेतला आहे. तीने आपल्या ४ वर्षीय मुलगी या संपत्तीची वारसदार असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात आता २४ जून रोजी सुनावणी होणार आहे.

5 एप्रिलला त्यांच्यावर झाडल्या गोळ्या- बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी त्यांच्या शारदानगर येथील घरासमोर, दुचाकीवरील दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी विविध राज्यांतून 11 आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली व आरोपींनी जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेली पल्सर दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. सुरुवातीला अटक केलेले 9 आरोपी 13 जूनपर्यंत पोलिस कोठडीत होते. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने 9 आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

हेही वाचा - विधानपरिषद निवडणुकीनिमित्त वेगवान राजकीय हालचाली, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक

यावेळी या प्रकरणात मोक्का कायदा वाढविल्याचे निवेदन न्यायालयात सादर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. आशिष गोदमगावकर यांनी या प्रकरणात संजय बियाणी यांना गोळी मारणाऱ्या आरोपींना पकडणे बाकी आहे. तसेच, इतर अनेक बाबींचा तपास करणे आहे. यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. तसेच, आरोपींच्या वतीने सहा वकिलांनी हे प्रकरण मोक्काचे नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता नऊ आरोपींना सात दिवस 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

हेही वाचा - Shivsena Foundation Day : शिवसेना नावाचा 56 वर्षाचा झंझावात! कशी राहिली आहे शिवसेनेची राजकीय वाटचाल? वाचा सविस्तर...

हेही वाचा - ...यामुळे आमचा पाचवा उमेदवार निवडून देईल - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.