ETV Bharat / state

नांदेडमध्ये 20 लाखांचा गुटखा जप्त, शासनाच्या नियमांची पायमल्ली - महाराष्ट्र शासनाने गुटखा प्रतिबंधित

मंगळवारी सायंकाळी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैलवान टी हाऊससमोर अकबर चाऊस यांच्या घरात छापा टाकला असता तेथे जवळपास 15 लाखांचा गुटखा पकडला. तर लगेचच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव रस्त्यावर अली नावाच्या एकाकडून घरातून जवळपास 5 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. यानंतर पकडलेल्या अकबर चाऊस याची इतवारा पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये 20 लाखांचा गुटखा जप्त
author img

By

Published : Sep 5, 2019, 4:55 PM IST

नांदेड - जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नांदेड ग्रामीण आणि इतवारा या दोन ठाण्याच्या हद्दीतून जवळपास 20 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे. अली आणि अकबर चाऊस अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकाराने शासनाने राज्यात निर्बंध घातलेल्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.

नांदेडमध्ये 20 लाखांचा गुटखा जप्त

मंगळवारी सायंकाळी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैलवान टी हाऊससमोर अकबर चाऊस यांच्या घरात छापा टाकला असता तेथे जवळपास 15 लाखांचा गुटखा पकडला. तर लगेचच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव रस्त्यावर अली नावाच्या एकाकडून घरातून जवळपास 5 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. यानंतर पकडलेल्या अकबर चाऊस याची इतवारा पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. तसेच गाडेगाव रोडवरील अली याला गुटख्यासह नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

हेही वाचा - विष्णुपुरी प्रकल्प १०० टक्के भरला, जलसंकट दुर झाल्याची नांदेडकरांची भावना

महाराष्ट्र शासनाने सुगंधी गुटखा प्रतिबंधित केला आहे. मात्र, तरीदेखील गुटख्याच्या विक्रीवर पूर्णपणे निर्बंध आणला गेला नाही. हे आजच्या दोन छाप्यांवरून सिध्द झाले. या गुटख्याची सध्या पूर्ण मोजदाद सुरु आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी या प्रकरणाची तक्रार देतील आणि पुढे कायदेशीर कार्यवाही होणार आहे.

पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या विशेष पथकाने अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक मगर यांच्या पथकात पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस कर्मचारी शेख जावेद, व्यंकट गंगुलवार, मोहम्मद सलीम, निर्मलसिंघ यांचा समावेश आहे.

हेही वाचा - भाजप-सेनेच्या कार्यकाळामध्ये राज्यावर फक्त नैराश्याची छाया पसरली - अशोक चव्हाण

Intro:नांदेड : वीस लाखांचा गुटखा जप्त, दोघांना घेतलं ताब्यात.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई.

नांदेड : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नांदेड ग्रामीण आणि इतवारा या दोन ठाण्याच्या हद्दीतून जवळपास २० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे.Body:
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या विशेष पथकाने अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी सायंकाळी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैलवान टी हाऊससमोर अकबर चाऊस यांच्या घरात छापा टाकला.तेथे जवळपास १५ लाखाचा गुटखा पकडला.याच पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव रस्त्यावर अली
नावाच्या एकाकडून घरातून जवळपास ५ लाख
रुपयांचा गुटखा पकडला आहे.पकडलेल्या अकबर चाऊस याची इतवारा पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. तसेच गाडेगाव रोडवरील अली याला गुटख्यासह नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.Conclusion:
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत गुटखा विक्री वर आज ही पूर्णपणे निबंध आणला गेला नाही हे आजच्या दोन छाप्यांवरून सिध्द झाले. या गुटख्याची सध्या पुर्ण मोजदाद सुरू आहे. त्यानंतर
अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी या प्रकरणाची तक्रार
देतील आणि पुढे कायदेशीर कार्यवाही होणार आहे.
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या पथकात
पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे, सहाय्यक
पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस कर्मचारी
शेख जावेद, व्यंकट गंगुलवार, मोहम्मद सलीम,
निर्मलसिंघ यांचा समावेश आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.