नांदेड - तीन ते चार महिन्यांपासून हदगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, मुख्य रस्त्यावरील दुकानांना चोरट्यांनी लक्ष केल्यामुळे शहरातील व्यापारी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी भागीरथीबाई कोल्हे यांच्या घरात भरदिवसा कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घर फोडून सहा तोळे सोने व रोख दहा हजार रुपये लंपास केले.
हेही वाचा - जमिनीच्या वादातून एकाची हत्या तर चार जण गंभीर जखमी; मूर्तिजापूर तालुक्यातील घटना
दोन दिवसांपूर्वी हदगाव-तामसा रोडवरील कृष्णा किराणा दुकानातील दोनशे किलोच्या तेलाच्या दोन टाक्या चोरट्यांनी चोरून नेल्या. दोन महिन्यांपूर्वी मुख्य रस्त्यावरील प्रशांत ट्रेडिंग कंपनी यांच्याही दुकानसमोरील तेलाच्या 200 किलोच्या दोन टाक्या चोरून नेल्या होत्या. त्यानंतर भुसार मार्केटमधील सुभाष गट्टाणी यांच्या दुकानांमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून दुकानातील रोख दहा हजार रुपये चोरून नेले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिसत असतानाही चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ होत असताना, पोलीस तपास किंवा कारवाई करत नसल्यामुळे चोरट्यांचे मनोधर्य वाढले असल्याचे नागरिक सांगत आहेत.
हेही वाचा - लिपिकावर हल्ला करून 'तो' स्वतःच झाला पोलीस ठाण्यात हजर