नांदेड - औरंगाबाद-चिकलठाणा विभागात औरंगाबाद जवळील रेल्वे फाटक ५४ वर भुयारी पुलाकरिता आर.सी.सी. बॉक्स बसविण्यात येत आहेत. या कामाकरिता १ फेब्रुवारीला तीन तासांचा तर २ फेब्रुवारीला चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वे गाड्या उशिरा धावतील, अशी सूचना दक्षिण-मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
पुढीलप्रमाणे गाड्याचा बदल असेल -
1) 1 फेब्रुवारीला दुपारी 02:50 ते 05:50 PM पर्यंत 180 मिनिटे लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या दिवशी पुढीलप्रमाणे बदल होईल.
- गाडी क्रमांक 57549 हैदराबाद ते औरंगाबाद सवारी गाडी जालना पर्यंतच धावेल. जालना ते औरंगाबाद दरम्यान रद्द असेल.
- गाडी क्रमांक 57550 औरंगाबाद ते हैदराबाद सवारी गाडी औरंगाबाद ऐवजी जालना येथूनच सुटेल. औरंगाबाद ते जालना दरम्यान रद्द असेल.
- गाडी क्रमांक 07066 औरंगाबाद ते नांदेड विशेष गाडी तिची नियमित वेळ सायंकाळी 05:00PM वाजता ऐवजी 55 मिनिटे उशिरा 17:55 मिनिटांनी सुटेल.
- गाडी क्रमांक 17867 मनमाड ते धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस औरंगाबाद येथून तिची नियमित वेळ सायंकाळी 06:00PM वाजता ऐवजी 15 मिनिटे उशिरा म्हणचे 06:15PM वाजता सुटेल.
हेही वाचा - 'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'
2) 2 फेब्रुवारीला दुपारी 02:50 ते 06:50 पर्यंत 240 मिनिटे लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या दिवशी पुढीलप्रणाणे बदल होईल.
- गाडी क्रमांक 77691 जालना ते नगरसोल डेमू पूर्णतः रद्द असेल.
- गाडी क्रमांक 77684 नगरसोल ते जालना डेमू पूर्णतः रद्द असेल.
- गाडी क्रमांक 57549 हैदराबाद ते औरंगाबाद सवारी गाडी जालना पर्यंतच धावेल. जालना ते औरंगाबाद दरम्यान रद्द असेल.
- गाडी क्रमांक 57550 औरंगाबाद ते हैदराबाद सवारी गाडी औरंगाबाद ऐवजी जालना येथूनच सुटेल. औरंगाबाद ते जालना दरम्यान रद्द असेल.
- गाडी क्रमांक 17687 मनमाड ते धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस औरंगाबाद येथून तिची नियमित वेळ सायंकाळी 06:00PM वाजता ऐवजी 55 मिनिटे उशिरा 06:55PM वाजता सुटेल.
- गाडी क्रमांक 57561 काचीगुडा ते मनमाड सवारी गाडी चिखलठाणा येथे 40 मिनिटे थांबेल.