ETV Bharat / state

'सरकार असते तर शेतकऱ्यांना तातडीने मदत देता आली असती' - crops damaged in Nanded

पालकमंत्री कदम यांनी नायगाव, मुखेड, नांदेड, अर्धापूर आणि बिलोली या 5 तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. पिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

रामदास कदम
author img

By

Published : Nov 3, 2019, 4:14 PM IST

नांदेड - सरकारची स्थापना तातडीने झाली असती, तर तातडीने शेतकऱ्यांना मदत करता आली असती, अशी खंत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली. नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री असलेल्या कदम यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हातील प्रमुख अधिकारी, माजी आमदार सुभाष साबणे, आमदार बालाजी कल्याणकर हेही होते.

रामदास कदम माध्यमांशी बोलताना

यावेळी कदम यांनी ताकाला जाऊन गाडगे लपवण्यात काय अर्थ आहे, असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकार स्थापनेबाबत शिवसेनेत देखील विभिन्न मतप्रवाह असल्याची शंका उपस्थित होत आहे.

हेही वाचा - नांदेडमध्ये वीज पडून आजोबा-नातवाचा मृत्यू

पालकमंत्री कदम यांनी नायगाव, मुखेड, नांदेड, अर्धापूर आणि बिलोली या 5 तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. पिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा - नांदेडमध्ये तलवार हल्ल्यात युवक जखमी

कदम यावेळी बोलताना म्हणाले, की नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन 100 टक्के वाया गेले आहे. कापसाला फटका बसला आहे, तर ज्वारीच्या पिकांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे राज्यपालांनी या बाबतीत त्वरित निर्णय घेऊन केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी. राज्यातील शेतकरी परतीच्या पावसाच्या फटक्याने बळी पडत असताना कर्मचारी-अधिकारी दिवाळी साजरी करत होते. हे उचित नसल्याची खंत पालकमंत्री कदम यांनी व्यक्त केली.

Intro:नांदेड : सरकार असते तर शेतकऱ्यांना तातडीने मदत देता आली असती - पर्यावरणमंत्री रामदास कदम

नांदेड : सरकारची स्थापना तातडीने झाली असती तर तातडीने शेतकऱ्यांना मदत करता आली असती अशी खंत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केलीय. एकीकडे शिवसेनेचे संजय राऊत हे सरकार स्थापनेबाबत तिढा निर्माण करतायत तर दुसरीकडे सेनेच्याच एका नेत्याचे असे वक्तव्य येण म्हणजे शिवसेनेतही आलबेल नसल्याचे स्पष्ट आहे.Body:
नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री असलेल्या कदम यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हातील प्रमुख अधिकारी, माजी आ. सुभाष साबणे, आ. बालाजी कल्याणकर यांचीही हजेरी होती. त्या नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जर तातडीने सरकार स्थापन झाले असते तर शेतकऱ्यांना तातडीने मदत करता आली असती , ताकाला जाऊन गाडगे लपवण्यात काय अर्थ आहे असे वक्तव्य केलेय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकार स्थापने बाबत शिवसेनेत देखील विभिन्न मतप्रवाह असल्याची शंका येतेय.Conclusion:
पालकमंत्री कदम यांनी नायगाव मुखेड नांदेड अर्धापूर आणि बिलोली या पाच तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. पिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते . कदम यावेळी बोलताना म्हणाले नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीन शंभर टक्के वाया गेले आहे . कापसाला फटका बसला आहे तर ज्वारीच्या पिकांवर कोंब फुटले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे राज्यपालांनी या बाबतीत त्वरित निर्णय घेऊन केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी . राज्यातील शेतकरी परतीच्या पावसाच्या फटक्याने बळी पडत असताना कर्मचारी-अधिकारी दिवाळी साजरी करत होते हे मात्र उचित नसल्याची खंत पालकमंत्री कदम यांनी व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.