ETV Bharat / state

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी - केंद्रीय मंत्री रामदास आठवले - राज ठाकरे माफी मागणी रामदास आठवले

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येला ( Raj Thackeray Ayodhya tour ) जावे, असे आवाहन रामदास आठवले ( Raj Thackeray should apologize say Ramdas Athawale ) यांनी केले आहे. ते नांदेड ( Ramdas Athawale news Nanded ) येथे आरपीआयच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त आले होते.

Raj Thackeray should apologize say Ramdas Athawale
राज ठाकरे माफी मागणी रामदास आठवले
author img

By

Published : May 22, 2022, 7:29 AM IST

नांदेड - राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येला ( Raj Thackeray Ayodhya tour ) जावे, असे आवाहन रामदास आठवले ( Raj Thackeray should apologize say Ramdas Athawale ) यांनी केले आहे. ते नांदेड येथे आरपीआयच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी ऊत्तर भारतीयांना मोठा विरोध केला होता. आता राज यांनी माफी मागावी ( Raj Thackeray apology demand ) आणि आयोध्येला जावे असे उत्तर भारतीयांचे म्हणणे आहे. त्यात चुकीचे काही नाही. ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला त्याचे स्वागत देखील आठवले ( Ramdas Athawale ) यांनी केले.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले

हेही वाचा - हरियाणात पकडलेल्या चारही दहशतवाद्यांनी केली होती नांदेडसह विविध भागात 'रेकी'

खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला दौऱ्याचा विरोध - मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जुनला अयोध्या दौऱ्यावर जाणार ( Raj Thackeray Ayodhya Tour ) होते. मात्र हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्याला खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांचा हा दौरा वादात सापडला. उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. जो पर्यंत राज ठाकरे उत्तर प्रदेशातील नागरिकांची माफी मागत नाही. तोपर्यंत त्यांना अयोध्येच्या सीमेमध्ये येऊ देणार नाही. पाच जुनला जास्तीत जास्त संख्येने अयोध्येत या, असे आवाहन ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर प्रदेशातील नागरिकांना केले ( Brij Bhushan Sharan Singh Attacked On Raj Thackeray ) होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या नंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील राज यांना माफीचे मागण्याचे आवाहन केले आहे. यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संभाजी राजे भोसले यांनी अपक्ष निवडणूक लढवू नये - माजी खासदार संभाजी राजे भोसले हे छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. त्यांना भाजपाने राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवले होते. मात्र, आता शिवसेना सहाव्या जागेवर आपला उमेदवार देणार आहे. त्यामुळे, हरण्यासाठी संभाजी राजे यांनी निवडणूक लढवू नये असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.

हेही वाचा - PUBG Addiction : नाशिक : पबजी खेळत 12 वर्षाचा नागेश रेल्वेने नांदेडहून पोहचला नाशिकला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.