नांदेड : (nanded crime ) भोकर पोलिसांना तेलंगणा सीमेवर जुगार चालत असल्याची माहिती मिळाली होती. ( Lakshmi Nrisimha Rice Mill ) त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी जुगार खेळत असलेल्या 17 जणांना अटक करण्यात आली. तर घटनास्थळावरून पोलिसांनी 16 लाख 82 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Raid on gambling dens) दोन्ही राज्यातील प्रतिष्ठित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहेत.( gambler arrested from Telangana and Maharashtra ) भोकर तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत असेलल्या किनी या गावच्या शिवारात बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिलमध्ये जुगार अड्डा सुरु झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. ( Raid on gambling dens in nanded )माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी अनेक जण तेथे जुगार खेळत अल्याचे आढळून आले. तेलंगणा आणि महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती, व्यापारी आणि बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले आहेत. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ( Nanded crime )
जुगार अड्डयावर सापळा रचून टाकली धाड : लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिलमध्ये जुगार अड्डा सुरु ( Gambling started in mill ) झाला असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून भोकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद बाचेवाड, ज्ञानेश्वर सरोदे, चंद्रकांत आर्किलवाड, सय्यद मोईन, विकास राठोड, प्रकाश वावळे आणि महिला पोलिस नायक सिमा वच्छेवार यांच्या पथकाने किनी गावच्या बंद राईस मिलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सापळा रचून धाड टाकली. घटनास्थळी तेलंगणा राज्य व महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती आणि बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा जुगार खेळताना घटनास्थळी दिसून आले. यावेळी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी या जुगार अड्ड्यावर करवाई केली. या कारवाईत जुगाऱ्यांकडून रोख 1 लाख 600 रुपये, 16 किमती मोबाईल, 7 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनासह जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 16 लाख 82 हजार 770 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
यांना झाली अटक : संजीव रेड्डी राहणार किनी तालुका भोकर या जुगार अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीसह संतोष खलशे राहणार दहेगाव, गणेश कदम राहणार निघवा, श्रीनिवास जाधव राहणार रंजणी, राजकुमार बालिजापल्ली, आनंद राठोड राहणार डोडरणा, अंकाम राहणार भोशी, मल्लेश नारडे राहणार कुबेर, बालाजी घोसालवाड राहणार बोळासा, विठ्ठल गोपवाड राहणार गोडसरा, देविदास येनकुसाब राहणार निघवा, गजराज पळसे राहणार पळशी, सत्यनारायण शिंदे राहणार दहेगाव, सुरेश ठाकूर राहणार पळशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण तेलंगणा राज्यातील आहेत. तर श्रीनिवास कदम राहणार लगळूद, गोविंद जाधव राहणार महागाव, दिलीप जाधव राहणार लगळूद अशी अटक करण्यात आलेल्या नांदेड लोकांची नावे आहेत.
जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल : पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून जुगार अड्डा चालविणाऱ्या बंद राईस मिलच्या मालकासह वरील 17 जुगाऱ्यांविरुद्ध जुगार कायदा प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.