ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात, राहुल गांधींसाठी जेवण... पिठलं भाकर

काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul gandhi ) यांची 'भारत जोडो यात्रा' ( Bharat Jodo Yatra ) सोमवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. आज रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास त्यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन झाले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली. सुरुवातीला तेलंगणा, कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 7, 2022, 8:35 PM IST

Updated : Nov 7, 2022, 10:18 PM IST

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul gandhi ) यांची 'भारत जोडो यात्रा' ( Bharat Jodo Yatra ) सोमवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. आज रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास त्यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन झाले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली. सुरुवातीला तेलंगणा, कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत केले आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

राहुल गांधींसाठी खास भोजन - राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील 'भारत जोडो यात्रेचा' नांदेडमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या भोजनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेले खाद्यपदार्थ या भोजनात असतील. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात 10 नोव्हेंबर रोजी पहिला सभा - राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे सगळे काँग्रेसचे नेते नांदेड जिल्ह्यातील देगलूरला आले आहे. भारत जोडो यात्रा ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात असणार आहे. जिल्ह्यात राहुल गांधींचे चार मुक्काम असणार आहे. नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर १० नोव्हेंबर रोजी या यात्रेतील राज्यातील पहिली सभा होईल. या सभेला काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात अशी असेल भारत जोडो यात्रा - भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमण करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सहभागी होणार होणार आहे.

काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो यात्रे'चे ट्विटर खाते ब्लॉक करा - खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ‘भारत जोडो’ यात्रेचे आयोजन केले आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. आता ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. दरम्यान, बंगळुरू येथील न्यायालयाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भारत जोडो यात्रेतील व्हिडिओमध्ये ‘केजीएफ-२’ चित्रपटातील गाणे वापरल्याने न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.

Last Updated : Nov 7, 2022, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.