ETV Bharat / state

राधाकृष्ण विखेंनी घेतले माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन, सुजयचा विषय टाळला - AHMEDNAGR

राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतले माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन... दर्शनावेळी सुजय विखेंचा विषय टाळला...म्हणाले मीडियाने अहमदनगरची निवडणूक टारगेट केलीय

राधाकृष्ण विखेंनी घेतले माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन
author img

By

Published : Mar 27, 2019, 10:09 AM IST

नांदेड - विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहूरगडावरील रेणुका देवीचे दर्शन घेतले. रेणुका माता आमची कुलस्वामिनी असून आपण नेहमीच नवरात्रीच्या पहिल्या माळेला माहूर गडावर दर्शनासाठी येत असतो. यावेळी नवरात्रात येणे न झाल्याने आता दर्शनाला हजेरी लावली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले, दरम्यान सुयय विखेंच्या भाजप प्रवेश आणि प्रचार बाबत विचारणा केली असता, देवीच्या ठिकाणी राजकीय विषय नको, असे सांगत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलणे टाळले.

राधाकृष्ण विखेंनी घेतले माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन

विखे-पाटील यांनी मंगळावरी सकाळी १० वाजता माहूरगडावरील रेणुका मातेचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी रेणुकादेवी संस्थांनच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, समीर भोपी,अश्विन भोपी, शुभम भोपी,यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी त्यांच्या समवेत विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांची उपस्थिती होती. शेगाव येथील गजानन बाबाचे सकाळी आठ वाजता दर्शन घेऊन ते माहूर गडावर दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्या नंतर पत्रकारांनी विखे पाटील यांची संवाद साधला. राज्यात दुष्काळाचे सावट असून बळीराजा हवालदिल झाला आहे. दुष्काळ कायमचा हटला पाहिजे, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळातून मुक्ती मिळो, शेतकरी आत्महत्या टळो, असे साकडे रेणुका मातेला घातले असल्याचे विखे म्हणाले.

माध्ममांनी केवळ नगरची निवडणूक टार्गेट केलीय-

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपनेही त्यांना अहमदनगर मधून लोकसभेचं तिकीट दिले आहे. या विषयी विचारणा केली असता, देवीच्या ठिकाणी राजकीय बोलणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी डॉ. सुजय विषयी बोलणे टाळले.देशा सह राज्यात लोकसभेची निवडणूक सुरू असतना मीडियाने केवळ नगरची निवडणूक टार्गेट केली आहे. मी या पूर्वी ही सांगितले आहे की,पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन व माझी भूमिका पुढच्या आठवड्यात मुंबई येथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वर्षातून किमान एक-दोन वेळा तरी माहूर दर्शनासाठी येणारे राधाकृष्ण विखे पाटील माध्यम प्रतिनिधींसह स्थानिक पुजाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे चांगल्याच परिचयाचे आहे. आज मात्र ते नेहमीच्या शैलीत दिसून आले नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य जाणवत होते. अवघ्या एका तासातच त्यांनी आपला दौरा आटपून हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण केले. या वेळी त्यांच्या समवेत भागवत देवसरकर, विनीत पाटील, शिवशंकर थोटे, संदीप पावडे, स्वप्नील जाधव, ऋषी क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौधरी, निखिल शिंदे पाटील, यांची उपस्थित होती.

Intro:राधाकृष्ण विखे पाटलांनी टाळला सुजयचा विषय; पुढील आठवड्यात करणार आपली भूमिका स्पष्ट!
मीडियाने नगरची निवडणूक टारगेट केली: - राधाकृष्ण विखे पाटील.

माहूर:-माहूरगड वासनी माता रेणुका आपली कुलस्वामिनी असून आपण नेहमीच नवरात्राच्या पहिल्या माळेला माहूर गडावर दर्शनासाठी येत असतो. यावेळी नवरात्रात येणं न झाल्याने आज आईच्या दरबारात हजेरी लावली आहे.असे सांगत देवीच्या ठिकाणी राजकीय विषय नको असे सांगत राधाकृष्ण विखे पाटील डॉ सुजय संदर्भात बोलणे टाळले.Body:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिनांक २६ रोजी सकाळी दहा वाजता माहूरगडावरील माता रेणुकेचे दर्शन घेऊन आरती केली .यावेळी रेणुकादेवी संस्थांनच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, समीर भोपी,अश्विन भोपी, शुभम भोपी,यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी त्यांच्या समवेत विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांची उपस्थिती होती. शेगाव येथील गजानन बाबा चे सकाळी आठ वाजता दर्शन घेऊन माहूर माहूर गडावर दर्शनासाठी आले असता दर्शन आटोपल्या नंतर पत्रकारांनी विखे पाटील यांची संवाद साधला. राज्यात दुष्काळाचे सावट असून बळीराजा हवालदिल झाला आहे. दुष्काळ कायम चे पूर्ण पने संपले पाहिजे, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळातून मुक्ती मिळो शेतकरी आत्महत्या टळो अशे साकडे माता रेणुकेला घटल्याचे त्यांनी सांगितले.राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपनेही त्यांना अहमदनगर मधून लोकसभेचं तिकीट दिले आहे या विषयी छेडले असता देवीच्या ठिकाणी राजकीय बोलणे योग्य नाही असे म्हणत त्यांनी डॉ सुजय विषयी बोलणे टाळले.देशा सह राज्यात लोकसभेची निवडणूक सुरू असतना मीडिया ने केवळ नगर ची निवडणूक टार्गेट केली आहे.मी या पूर्वी ही सांगितले आहे की,पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन व माझी भूमिका पुढच्या आठवड्यात मुंबई येथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्ट करनार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.एका तासातच त्यांनी आपला दौरा आटपून हेलिकॉप्टर ने औरंगाबाद कडे प्रयाण केले. या वेळी त्यांच्या समवेत भागवत देवसरकर,विनीत पाटील, शिवशंकर थोटे, संदीप पावडे, स्वप्नील जाधव, ऋषी क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौधरी, निखिल शिंदे पाटील, यांची उपस्थित होती.Conclusion:
- राधाकृष्ण विखे पाटील अपसेट.

वर्षातून किमान एक-दोन वेळा तरी माहूर दर्शनासाठी येणारे राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांचे प्रतिनिधी सह स्थानिक पुजाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे चांगल्याच परिचयाचे आहे. आज मात्र ते नेहमीच्या शैलीत दिसून आले नाही, त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य जाणवत होते. त्यांना अपसेट बघून उपस्थित वेगवेगळी चर्चा सुरू होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.