ETV Bharat / state

नांदेड : बिलोली तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान...

author img

By

Published : Mar 11, 2020, 12:09 PM IST

गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तालुक्यात शेतातील पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशातच निसर्गाच्या अवकृपेचाही फटका शेतकऱ्याला बसत आहे.

rabbi crops loss due to unseasonal rainfall
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

नांदेड - बिलोली तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. अगोदरच पिकांवर पडणारे विविध रोगांमुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि वादळी वारा, यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील रब्बी पिकांचे नुकसान...

हेही वाचा... धुळवड बेतली जीवावर, नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

हाताशी आलेले पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याच्या हातातून गेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडच्या बिलोली तालुक्यात पिकांवर पडणारे विविध रोग यामुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.