नांदेड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारार्थ भोकर येथील नवा मोंढा मैदानात सकाळी ११ वाजता जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सांयकाळी ४ वाजता हदगाव येथील शिवाजी चौक येथे ही सभा होणार आहे.