ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात ६ ते १० मे कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता - Nanded weather forecast

नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची, तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे.

जिल्ह्यात ६ ते १० मे कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

author img

By

Published : May 7, 2021, 9:24 AM IST

नांदेड - प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०६ मे ते १० मे या काळात नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची, तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून या काळात खबरदारी व उपाययोजनेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

या गोष्टी करा -

१ ) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठलाही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२ ) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी , छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३ ) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४ ) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५ ) पाण्यात उभे असाल तर तत्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका -

१ ) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२ ) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३ ) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४ ) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका.

५ ) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.