नांदेड - जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. १५ जानेवारी रोजी हे मतदान होणार आहे. तर आज सकाळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, मतदारांनी निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
९०७ ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान -
जिल्ह्यात १०१३ ग्रामपंचायतींसाठी मतदान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्या पैकी १०६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ९०७ ग्रामपंचतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी २८५६ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तर ११४१२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
१३ लाख २१ हजार २९६ मतदार मतदान करणार -
या निवडणुकीला १३,२१,२९६ मतदान मतदान करणार आहेत. त्या पैकी ६ लाख ३२ हजार १३८ महिला मतदार आहेत, तर ६ लाख ८९ १४६ पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निर्भीडपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -
मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. प्रत्येक मतदार केंद्रावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे. मतदारांनी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता जास्तीतजास्त मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.
हेही वाचा - अगोदर मारली मीठी, नंतर पतीने दिला पत्नीला धावत्या लोकलमधून धक्का