नांदेड : सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग ( Political Crisess In Maharastra ) आला आहे. शिंदेंच्या राजकीय बंडामुळे राज्यात मोठा गोंधळ झाला आहे. शिवसेनासुद्धा आता सक्रिय झाली आहे. काल संजय राऊत यांनीसुद्धा बंडखोरांना इशारा दिला होता. त्यामुळे अनेक सेना आमदारांच्या कार्यालयावर हल्ले ( Attacks on MLAs Offices ) होऊ लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खा.प्रताप पाटील ( MP Pratap Patil Chikhlikar ) यांनी ही भुमिका जाहिर केली आहे.
प्रताप पाटील चिखलीकर यांची परखड प्रतिक्रिया : नांदेडचे बंडखोर सेना आमदार बालाजी कल्याणकर ( Rebel MLA Balaji Kalyankar ) यांच्या केसालाही हात लावण्याची कोणात हिम्मत नाही, अशी प्रतिक्रिया देताना भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर ( MP Pratap Patil Chikhlikar ) यांनी शिवसैनिकांना इशारा दिला. बालाजी कल्याणकर हे शिंदे गटासोबत सामील झाले आहेत. कल्याणकर यांच्या कार्यालयावर शिवसैनिक हल्ला ( Attack on Kalyankar Office ) करणार असल्याच्या चर्चा आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चिखलीकर यांनी आमदार कल्याणकर यांची पाठराखण केली.
आमदार कल्याणकर यांच्यासाठी भाजपनेही सहकार्य केले : कल्याणकर हे सेना भाजपचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी भाजपनेही मेहनत घेतली. हिंदुत्वाच्या मुद्यावर ते शिंदेसोबत गेले आहेत. त्यामुळे कल्याणकर यांच्या केसाला धक्का लागणार नाही, याची हमी खासदार चिखलीकर यांनी दिली. कल्याणकर यांच्यावर हल्ला करणे एवढे सोपे नाही. कोणीही कोणाला धमकी देऊ शकतात, पण ते करणे अवघड असते. शिवसेनेचे खासदार नाराज असून सत्ता स्थापन झाली की किमान 10 खासदार भाजपात येतील, अशी प्रतिक्रिया नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.