नांदेड - जिल्ह्यातील शेंबोली (ता.मुदखेड) शिवारातील एका तीन महिन्याच्या गाईच्या वासरावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंबोली येथील एक व्यक्ती शिवारात तीन महिन्याच्या गाईच्या वासरावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वासराच्या मालकाने दिलेल्या तक्रारीवरून भा.दं.वि. कलम 377, कलम 11 प्रमाणे प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच.सी मोरखंडे करीत आहेत.
हेही वाचा - बेपत्ता तरुणीचा संशयास्परीत्या विहिरीत आढळला मृतदेह