ETV Bharat / state

दिलासादायक ! नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण - नांदेड कोरोना अपडेट

आज प्राप्त झालेल्या 2 हजार 774 अहवालापैकी  15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत.

दिलासादायक ! नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण

author img

By

Published : Jun 12, 2021, 10:14 PM IST

नांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगली घट झाली असून पॉझिटिव्ह दर 0.54 टक्के पर्यंत आला आहे. आज प्राप्त झालेल्या 2 हजार 774 अहवालापैकी 15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 90 हजार 885 एवढी झाली असून यातील 87 हजार 918 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 529 रुग्ण उपचार घेत असून 6 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

दोन जणांचा मृत्यू
दि. 11 जून रोजी गोदावरी कोविड रुग्णालयात पाटबंधारे नगर नांदेड येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा तर 12 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे इंदिरानगर अर्धापूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 897 एवढी आहे. आज 529 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.

उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 115, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 132 खाटा उपलब्ध आहेत.

नांदेड जिल्हा कोरोना अलर्ट (दि.१२ जून पर्यंत)

जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल- २७७४

जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-१५ (पॉझिटिव्ह दर- ०.५४%)

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा- ९०८८५
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू- १८९७

आज बरे झालेली रुग्णसंख्या - ४६

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या -
८७९१८

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- (९६.७३%)

जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या - ५२९

जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या - ६

आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने - ५७३७२५

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.