ETV Bharat / state

विशेष रिपोर्ट: कोरोनाच्या संघर्षाची वर्षपूर्ती; नांदेड जिल्ह्यात कटू आठवण घेऊन कोरोनाची लढाई सुरूच

author img

By

Published : Mar 19, 2021, 12:46 PM IST

२२ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून वर्ष उलटणार असले तरी संसर्ग मात्र अद्यापही आटोक्यात आला नाही. त्याकाळातील कटू आठवणी सोबत घेऊन जीवन जगण्याची ही लढाई सुरूच आहे. कोरोनामुळे नांदे-ड जिल्ह्यात विविध क्षेत्रांवर झालेले परिणाम आपण जाणून घेणार आहोत.

one-year-corona-review-of-nanded-district
कोरोना

नांदेड: कोरोनाच्या महामारीने लोकल ते ग्लोबल असा सर्वव्यापी परिणाम झाला. या काळात सर्व क्षेत्रातील उणिवा प्रगट झाल्या त्याचसोबत जाणिवा देखील निर्माण झाल्या आहेत. या काळात असे कुठलेच क्षेत्र राहीले नाही की, त्यावर कोरोनाचा परिणाम झाला नाही. यात आरोग्य, आर्थिक, शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार, बेरोजगारी, हिंसाचार सर्वांचा समावेश आहे. २२ मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून वर्ष उलटणार असले तरी संसर्ग मात्र अद्यापही आटोक्यात आला नाही. त्याकाळातील कटू आठवणी सोबत घेऊन जीवन जगण्याची ही लढाई सुरूच आहे. कोरोनामुळे नांदे-ड जिल्ह्यात विविध क्षेत्रांवर झालेले परिणाम आपण जाणून घेणार आहोत.

आरोग्य -
शत्रू जेव्हा उघड असतो त्याच्याशी लढणे सोपे असते. पण जेव्हा तो अदृश्य असतो त्याच्याशी लढणे अतिशय कठीण असते. या अदृश्य विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणा जिकिरीचे काम करत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात 200 खाटांचे रुग्णालय सुरू झाले. इतर काही थोड्या प्रमाणात सुविधा सोडल्यातर अजूनही आरोग्याच्या बाबतीतील भौतिक सुविधा व उपाययोजनेला गती नाही. अजूनही डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अजूनही बराच अपुरा कर्मचारी वर्ग आहे. व्हेंटिलेटरची वानवा आहे. गेल्या वर्षभरात डॉक्टर, आरोग्य सेवक, परिचारिका यांनी मात्र जीवावर उदार होऊन आपले काम बजावले. आणि आजही त्याच तत्परतेने काम सुरू आहे. त्यातच वाढता कोरोनाचा गैरफायदा घेऊन खासगी दुकानदारीही पाहायला मिळाली. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची उपचाराचे शुल्क पाच लाख रुपयांपर्यंत पाहायला मिळाले.

लॉकडाऊन आणि कोरोनाचा नांदेड जिल्ह्यावर झालेला परिणाम...
उद्योग-व्यापार -कोरोना महामारीमुळे तब्बल तीन महिने लॉकडाऊनमुळे उद्योग व्यापाराचे अर्थचक्र थांबले. निर्मिती आणि विक्री हे दोन्ही चाक थांबल्यामुळे अनेक उद्योग व व्यापार बंद पडले. त्यातच बारा बलुतेदार म्हणून काम करणारे उद्योगही बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. अजून किरकोळ व्यापारी व विक्रेते या धक्क्यातून सावरले नाहीत. त्यातच पून्हा वाढत्या कोरोनामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. छोट्या व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे.बेरोजगारी - लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसला. अनेक उद्योग व कारखानदारी बंद पडल्यामुळे हातचा रोजगार गेला. अनेकांना गावचा रस्ता पकडावा लागला. जिल्ह्यात हा आकडा अनेक लाखाच्या घरात आहे. अनेकांना तर हजारो किलोमीटर पायीच प्रवास करून आणि आपले घर गाठावे लागले.शेती -जगात कुठलेही संकट आले तरी त्याचा पहिला मार हा शेतकऱ्यांवरच असतो. शेतीला मोठा फटका बसलेला आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला मागणी नव्हती. शेतातील फळे, भाजीपाला, फुले यांची नासाडी झाली. शेतातील माल बाहेर फेकावा लागला. पण याच शेतीने अनेकांच्या हाताला रोजगारही दिला. सगळीकडे कामे बंद असताना मात्र शेतीतील कामे सुरूच आहेत.शिक्षण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाची विस्कटलेली घडी अजूनही सुरूच आहे. अख्ख वर्षभर विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. नेमकीच शाळा सुरू होण्याची परिस्थिती असताना पून्हा शाळा आणि खासगी क्लासेस बंद पडले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत मात्र एक बदल आवर्जून पाहायला मिळाला. तो म्हणजे शाळेशिवाय ऑनलाइन शिक्षण हा आमूलाग्र बदल पाहायला मिळाला. तसेच कार्यालयात न जाता ऑनलाईन ड्युटी ही संकल्पना समोर आली आहे.सामाजिक उणीवा आणि जाणिवा -एका छोट्याश्या विषाणूने अनेक नात्यांमध्ये दुरावा आणला. कोरोना झाल्यानंतर तो व्यक्ती कितीही जवळचा असला तरीही त्या व्यक्तीबाबत दुरावा निर्माण झाला होता. एकमेकांच्या सामाजिक अंतरासह मनातील अंतरही वाढले होते. कुणी-कुणाला मदत करायला पुढे येत नव्हते. या सामाजिक उणिवा पाहायला मिळाल्या. त्यातच कठीण काळातही अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणारे फिरस्ती, मजूर, पाल टाकून बसलेले भटके यांना मदत करून यांच्यासह अनेकांना मदत करून सामाजीकतेची जाणीवही करून दिली. तसेच जीवाची पर्वा न करता कोरोनाचे मृत्यू पावलेल्या रुग्णांचा अंत्यविधी केला. जिल्ह्यातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना कोरोनाने घेरले -जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इंटनकर यांच्यासह अनेकांना कोरोनाने ग्रासले. त्यातच काही जणांना आपले प्राण ही गमवावे लागले. काळजी घेणे हाच उपाय -कोरोनाची लस देणे सुरू झाले असले तरी काळजी घेणे आवश्यकच आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्ष्यात घेता. सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर यावर त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे.जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -(दि.18/03/2021 पर्यंत)एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 59 हजार 04एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 25 हजार 20एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 29 हजार 145एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 565एकुण मृत्यू संख्या-627

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.28 टक्के -
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 728
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 51

हेही वाचा - उपराजधानीत कोरोनाचा कहर; नागपुरात 3 हजार 796, तर पूर्व विदर्भात 4 हजार 501 बाधित रूग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.