ETV Bharat / state

नांदेडमध्ये दिवसभरात एका कोरोनाबाधिताची भर;  4 रुग्ण बरे

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील 2 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील 1 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बिलोली येथील 1 रुग्ण असे एकूण 4 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 138 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 90 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

Dr.  Shankarrao Chavan Medical College and Hospital
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
author img

By

Published : May 28, 2020, 9:22 PM IST

नांदेड- जिल्ह्यात आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 49 अहवालापैकी 47 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात 1 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे. या रुग्णावर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे. हा रुग्ण 35 वर्ष वयाचा असून तो लोहार गल्ली, नांदेड भागात राहणारा आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील 2 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील 1 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बिलोली येथील 1 रुग्ण असे एकूण 4 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 138 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 90 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरित 43 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 2 स्त्री रुग्ण वय वर्षे 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे.

आज सांयकाळपर्यंतची कोरोना संशयित व बाधित रुग्णांची संक्षिप्त माहिती-

सर्वेक्षण- 1 लाख 37 हजार 540, घेतलेले स्वॅब 3 हजार 621, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 132, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 01, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 138, स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या 141, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यू संख्या 7, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 90, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 41, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 192 एवढी आहे. बुधवारी (27 मे) पाठवण्यात आलेल्या 73 स्वॅब तपासणी अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. तर आज 119 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील.

आतापर्यंत 138 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि 88 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 41 रुग्णांपैकी 06 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, पंजाब भवन कोविड केअर सेंटर, यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 21 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहेत. सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.