नांदेड - जिल्हा कोरोना संसर्गाचा बाबतीत समाधानकारक परिस्थितीत आहे. अद्याप जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला नाही. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८७ लोकांना क्वारंटाइन केले होते. त्यामध्ये १२२ जणांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली असलेल्यांची संख्या २९ आहे.
हेही वाचा.... 'ती' बातमी साफ खोटी, कोरोनामुळे राज्याचे जिल्हानिहाय 'झोन' केलेले नाहीत - विश्वजीत कदम
जिल्ह्यात घरीच क्वारंटाइनमध्ये असलेल्यांची संख्या ४८७ आहे. आज दि. १३ एप्रिल रोजी तपासणीसाठी १७ नमुने घेतले होते. आतापर्यंत एकुण २१७ जणांचे नमुने तपासणी पाठवले होते. त्यापैकी १९५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आज पाठवण्यात आलेल्या १७ नमून्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. नाकारण्यात आलेले नमुने ५ आहेत.
नांदेड जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ७२ हजार ३४० असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. असे नांदेडच्या आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.