ETV Bharat / state

Indorikar Maharaj News : इंदुरीकर महाराजांना माध्यमांची धास्ती, कॅमेरे बंद करायला लावूनच कार्यक्रमाला केली सुरुवात - Gaitami Patil

गौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आता माध्यमांची आणि सोशल मीडियाची धास्ती घेतली आहे. नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात इंदूरीकर महाराजांनी कार्यक्रमात चित्रीकरण करणारे कॅमेरे आणि मोबाईलवर बंद करणास सांगितले.

Indurikar Maharaj and Gaitami Patil
इंदुरीकर महाराज आणि गैतमी पाटील
author img

By

Published : Apr 20, 2023, 10:57 AM IST

इंदूरीकर महाराजांनी कार्यक्रमात चित्रीकरण, कॅमेरे करायला लावले बंद

नांदेड: .इंदुरीकर महाराज कीर्तन करताना आपल्या शैलीतून अनेकांचा समाचार घेतात. सध्या गौतमी पाटील हिने आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य भरात धुडगूस घातला आहे. इंदूरीकर महाराजांनी देखील एका कार्यक्रमात गौतमी पाटील हीचा समाचार घेत टीका केली होती. गैतामी पाटील हे एका गाण्यासाठी तीन लाख रुपय घेते असे वक्तव्य इंदूरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला होता. महिला संघटनांनी या वक्तव्याचा निषेध करत इंदुरीकर महाराज महिला विरोधी असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. या प्रकारानंतर इंदुरीकर महाराज यांनी सावध भूमिका घेतली आहे. आपल्या कीर्तनातून बाहेर काही जाऊ नये म्हणून नांदेड येथील कार्यक्रमात त्यांनी मोबाईल आणि चित्रीकरण करणारे कॅमेरे हटविले. त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात केली.

इंदुरिकर यांचे आक्रमक रूप: स्वातंत्र सैनिक कै.भाऊराव पावडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी : ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर हे नांदेडला आले होते. यावेळी त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी प्रचंड अशी गर्दी झाली. कार्यक्रमाला तब्बल वीस हजाराच्या जवळपास नागरिक उपस्थित होते. आयोजक राजेश पावडे यांनी येणाऱ्या सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था केली होती. इंदुरीकर महाराज यांनी मीडिया प्रतिनिधींना कीर्तनापूर्वीच कॅमेरे बंद करण्यास लावले. मागील गौतमी पाटीलच्या प्रकारानंतर इंदुरीकर महाराज यांनी सावध भूमिका घेतली आहे. आपल्या कीर्तनातून बाहेर काही जाऊ नये म्हणून त्यांनी कॅमेरे आणि मोबाईल बंद करण्यास सांगितले. तसेच राजकारणावर व सध्याच्या परिस्थितीवर काही बोलतील या आशेने आलेल्या भाविकांना, मात्र कीर्तनकार प्रवचनकार इंदुरीकर यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले.

महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन : स्वातंत्र सैनिक कै. भाऊरावजी पावडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, इंदुरीकर यांचे कीर्तन सोहळा व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर संचालक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या अकोला, राजेश भाऊराव पावडे व जिल्हा बँक संचालक संगीता राजेश पावडे यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, महोनराव हंबर्डे, अमरनाथ राजूरकर, वसंतराव चव्हाण, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे तसेच भाविक मोठ्या प्रमाणत उपस्थिती होते.

हेही वाचा: Gautami Patil V Indorikar Maharaj गौतमी पाटील यांनी लावणी संस्कृती बिघडविली इंदुरीकर महाराजांनासंत साहित्यिक सदानंद मोरेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.