ETV Bharat / state

चिंताजनक... नांदेडमध्ये शनिवारी 94 कोरोनाबाधितांची भर; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात शनिवारी 94 कोरोनाबाधित वाढल्यामुळे रुग्णसंख्या 869 वर पोहोचली आहे. दिवसभरात 7 जण कोरोनामुक्त झाले. नांदेडमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 476 वर पोहोचली आहे, तर 44 जणांचा मृत्यू झाला आहे.

nanded corona update
नांदेड कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 19, 2020, 7:44 AM IST

नांदेड- जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ वेगाने होत आहे. शनिवारी नांदेडमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 94 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले.यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 66 तर अँटीजन टेस्ट किट तपासणीद्वारे 28 बाधित आहेत. दिवसभरात 7 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

विष्णुनगर, नांदेड येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत् व्यक्तींची संख्या 44 एवढी झाली आहे. यात 38 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत 6 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत.

जिल्हा प्रशासनाला दिवसभरात एकूण 359 अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 254 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 869 झाली आहे. यातील 476 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. शनिवारपर्यंत 349 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 27 जणांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 14 महिला व 13 पुरुषांचा समावेश आहे.

कोरोनामुक्त झालेल्या 7 बाधितांमध्ये नायगाव कोविड केअर सेंटर येथील 2, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 2 तसेच जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथील संदर्भीत करण्यात आलेला एका जणाचा यात समावेश आहे.

नवीन कोरोनाबाधितांमध्ये नांदेड शहरासह देगलूर, कंधार, मुखेड, मुक्रामाबाद, किनवट नायगाव, कळमनूरी, वसमत जिंतूर, गंगाखेड, परळी, येथील रुग्णांचा समावेश आहे. नांदेड शहरातील ॲन्टीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे 108 नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 28 पॉझिटिव्ह आढळून आले.

जिल्ह्यात 349 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 99, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 93, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 12, जिल्हा रुग्णालय येथे 19, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 12, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 18, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 2, लोहा कोविड केअर सेंटर येथे 2, कंधार कोविड केअर सेंटर येथे 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3 , खाजगी रुग्णालयात 44 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे तर निजामाबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोनाबाधितांची व संभाव्य रुग्णांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 201

घेतलेले स्वॅब- 9 हजार 826

निगेटिव्ह स्वॅब- 7 हजार 873

एकुण कोरोनाबाधित व्यक्ती- 869

मृत्यू संख्या- 44

कोरोनामुक्त संख्या- 476

अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या- 349

शनिवारची कोरोनाबाधित संक्षिप्त माहिती

शनिवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 94

तपासणी अनिर्णीत संख्या- 8

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3

प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 407

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.