नांदेड - येथे आज(गुरुवारी) आणखी २१ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २२४ वर पोहोचला असून आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यात काल (बुधवार) १० रुग्ण सापडल्यानंतर गुरुवारी तब्बल २१ रुग्ण सापडल्याने नांदेड पुन्हा एकदा हादरले आहे. आज सकाळी ५ रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा सायंकाळी वीज कडाडल्यासारखे झाले आणि नवे १६ रुग्ण समोर आले. यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढून आकडा २२४ वर पोहचला आहे.
दिवसभरात सापडलेले विविध भागातील रुग्ण
गुलजारबाग - ८ रुग्ण
ईतवारा - ५ रुग्ण
चौफाळा - १
फरांदेनगर - १
खोजा कॉलनी - १
उमर कॉलनी - १
देगलूर नाका -१
मुखेड - २
देगलूर नाका-२
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती गुरुवारी संध्याकाळी ५ पर्यंतची माहिती -
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4639
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या - 4382
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2445
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 107
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 128
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4254
• आज घेतलेले नमुने - 53
• एकुण नमुने तपासणी- 4711
• एकुण पॉझिटिव्ह रुग्ण- 224
• पैकी निगेटिव्ह - 4154
• नमुने तपासणी अहवाल बाकी - 62
• नाकारण्यात आलेले नमुने - 83
• अनिर्णित अहवाल – 181
• कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 139
• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यूसंख्या – 11
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 44 हजार 220 असून त्यांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.