ETV Bharat / state

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागात 14 चारचाकी व 75 दुचाकी वाहनांची भर - नांदेड वाहन बातमी

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी व पोलिसांना निरोप मिळाल्याबरोबर तात्काळ घटनास्थळावर हजर राहता यावे. जिल्हा पोलिसांच्या ताफ्यात आता 14 चारचाकी व 76 दुचाकीची भर पडली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Aug 15, 2021, 10:03 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी व पोलिसांना निरोप मिळाल्याबरोबर तात्काळ घटनास्थळावर हजर राहता यावे. जिल्हा पोलिसांच्या ताफ्यात आता 14 चारचाकी व 76 दुचाकीची भर पडली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या पोलीस मदतीच्या या सेवेला मजबूत करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीकडून निधीची उपलब्धतात करुन दिली. या निधीतून नांदेड जिल्हा पोलीस दलांची कार्यक्षमता वाढण्यास मोलाची मदत होऊन गरजू नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहेत.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संवाद साधून पोलिसांना दिल्या शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही वाहने पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली. ‍यावेळी छोटेखानी समारंभात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संवाद साधून पोलिसांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्याच्या पोलीस विभागाला 45 चारचाकी वाहने व 76 दुचाकी वाहनाची मंजुरी दिली आहे.

हेही वाचा - सामान्य माणसाच्या जगण्यातील आव्हाने कमी करण्यासाठी कटिबद्ध -अशोक चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.