ETV Bharat / state

देशाचे तुकडे करून काँग्रेसला २ पंतप्रधान हवे आहेत - नरेंद्र मोदी

या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर
author img

By

Published : Apr 7, 2019, 5:33 AM IST

नांदेड - काँग्रेस आणि त्यांच्या महागठबंधनला २ पंतप्रधान हवे आहेत. देशद्रोहाचा कायदा रद्द करणे योग्य नाही. काश्मीरमधील आजच्या स्थितीला काँग्रेस जबाबदार आहे. आता या आगीला अजून काँग्रेस आणि त्यांचे साथी भडकविण्याचे काम करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा झाली

नांदेडमध्ये झालेल्या या सभेत मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर जोरदार टीका केली. चिटफंड, बोफार्स, हेलिकॉप्टर काँग्रेसचे घोटाळे अनेक आहेत. इटलीच्या त्या गुन्हेगाराला अटक करण्याचे काम या चौकीदाराने केले आहे. हेलिकॉप्टरच्या घोटाळ्यात कोण-कोण सामील आहे. हे लक्ष्यात येतच आहे. तुमचे एक मत या देशात नवा बदल घडवेल. भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता थारा नाही. काँग्रेसची स्थिती बिकट आहे. यावेळी काँग्रेस ४४ च्याही मागे येईल, असे मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे, सुरजितसिंह ठाकूर, भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, शिवसेना उमेदवार हेमंत पाटील, बंडू जाधव, आमदार राम पाटील रातोळीकर आदी उपस्थित होते.

Intro:देशाचे तुकडे करून काँग्रेसला दोन पंतप्रधान हवे आहेत-नरेंद्र मोदी

Body:
देशाचे तुकडे करून काँग्रेसला दोन पंतप्रधान हवे आहेत-नरेंद्र मोदी

नांदेड: काँग्रेस आणि त्यांच्या महागठबंधनला दोन पंतप्रधान हवे आहेत. काँग्रेस ही पाकिस्तान कडून पैसे घेऊन भारताचे तुकडे करण्याच्या मागे आहे. देशद्रोहाचा कायदा रद्द करणे योग्य नाही. आजच्या काळातील देशातील स्थिती ही काँग्रेस जबाबदार आहे. या आगीला अजून काँग्रेस आणि त्यांचे साथी भडकविण्याचे काम करत आहेत. असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,
चीटफंड, बोफार्स, हेलिकॉप्टर काँग्रेसचे घोटाळे अनेक आहेत. इटलीच्या त्या गुन्हेगाराला अटक करण्याचे काम या चौकीदाराने केले आहे. हेलिकॉप्टरच्या घोटाळ्यात कोण-कोण सामील आहे. हे लक्ष्यात येतच आहे. तुमचे एक मत या देशात नवा बदल घडवेल. भ्रष्टाचार करणाऱ्याना आता थारा नाही. काँग्रेसची स्थिती बिकट आहे. यावेळी काँग्रेस ४४ च्याही मागे येईल. काँग्रेसने अशी उमेदवारी शोधली ज्या ठिकाणी आपली सुरक्षितता शोधली. काँगेसची टायटॅनिक जहाजासारखी स्थिती झाली आहे. सातव, पवार, पटेल यांनी पळ काढला आहे. अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला. नांदेड-अमृतसर ही विमानसेवा सुरू केली. भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे, सुरजितसिंह ठाकूर, भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, शिवसेना उमेदवार हेमंत पाटील, बंडू जाधव, आ. राम पाटील रातोळीकर आदी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.