ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: लॉकडाऊन खुले होताच पानाचा विडा रंगला...!

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील चाभरा (ता.अर्धापूर) येथील शेतकरी नागवेली पानाची लागवड करतात. येथील पानांची चव सर्वदूर पसरली आहे.

author img

By

Published : Jun 12, 2021, 9:18 PM IST

Updated : Jun 12, 2021, 9:29 PM IST

लॉकडाऊन खुले होताच पानाचा विडा रंगला.
लॉकडाऊन खुले होताच पानाचा विडा रंगला.

नांदेड- लॉकडाऊनमुळे शेतीमाल बाजारात जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल फेकून देण्याची वेळ आली. नागवेलीच्या पानाचे उत्पन्न करणारा शेतकरी यातूनही सुटला नाही. या शेतकऱ्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसला होता. संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे. मोठ्या अवधीनंतर नागवेलीच्या पानाची मागणी वाढल्याने पान विड्याला रंग चढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील चाभरा (ता.अर्धापूर) येथील शेतकरी नागवेली पानाची लागवड करतात. येथील पानांची चव सर्वदूर पसरली आहे. नागवेली पान मळ्यातून वर्षाकाठीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद असल्याने नागवेली पानाची मागणी बंद झाली होती.

लॉकडाऊन खुले होताच पानाचा विडा रंगला...!

हेही वाचा-दरवाढीचा भडका! पेट्रोलबरोबर डिझेलने या शहरात ओलांडला शतकाचा उंबरठा

मजुरांचा खर्चही निघणे झाले होते अवघड...!

लॉकडाऊनमध्ये नागवेली पानाला कवडीमोल दर मिळू लागला होता. पान तोडणाऱ्या मजुराचा खर्चसुद्धा निघत नव्हता. लग्नसराईत नागवेली पानाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु लग्नसराईतच लॉकडाऊन असल्याने लग्न समारंभ बंद होते. म्हणून पानाला मागणीच नव्हती. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पान तोडणी बंदच केली होती. पान तोडणीस येत नसल्याने झाडावरच पान वाळून जात होते.

पानाचा विडा रंगला
पानाचा विडा रंगला

हेही वाचा-अपहरण करून हत्या झालेल्या १६ वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल

अनलॉकमुळे लाली चढली..!

मागील आठवड्यापासून राज्यात अनलॉक करण्यात आल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे. दररोज ५० ते ६० रुपये शेकडा पान विकले जात आहे. अनलॉक झाल्याने नागवेली पानाला मागणी वाढली आहे. सध्या श्रीरामपूर, परभणी, जळगांव, नाशिक, भुसावळ, अहमदनगर, नागपूरसह आदी शहरासह गुजरात राज्यातून पानांची मागणी वाढली असून पानांची लाली वाढली आहे.

हेही वाचा-आघाडी सरकारकडून राज्याचा बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग - चंद्रकांत पाटील

भविष्यात भाव स्थिर राहतील ही अपेक्षा...!

गेल्या दोन वर्षापासून पान उत्पादक शेतकऱ्यांना सारखा फटका बसत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला मळा काढून टाकला आहे. त्यातच उत्पादन कमी झाले आणि मागणी वाढली. त्यामुळे येणाऱ्या काळात नागवेलीच्या पानांची मागणी वाढेल. आणि भाव स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया पान उत्पादक शेतकरी शंकरराव मरकुंदे यांनी दिली.

Last Updated : Jun 12, 2021, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.