ETV Bharat / state

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज सोडत; इच्छुक मुंबईला रवाना - नांदेड जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज (दि.19नोव्हें)ला सकाळी साडेअकराच्या सुमारास काढण्यात येणार आहे. मंत्रालयातील परिषद सभागृह क्रमांक 4 येथे या सोडतीचा ड्रॉ निघणार असल्याची माहिती राज्य सरकारचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज (दि.19नोव्हें)ला सकाळी साडेअकराच्या सुमारास काढण्यात येणार आहे.
author img

By

Published : Nov 19, 2019, 12:29 PM IST

नांदेड - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज (दि.19नोव्हें)ला सकाळी साडेअकराच्या सुमारास काढण्यात येणार आहे. मंत्रालयातील परिषद सभागृह क्रमांक 4 येथे या सोडतीचा ड्रॉ निघणार असल्याची माहिती राज्य सरकारचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी दिली आहे.

यासाठी इच्छुक उमेदवार काल (सोमवार) सायंकाळी मुंबईला रवाना झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून, विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. डिसेंबरमध्ये ही मुदतवाढ संपत असल्याने आरक्षण सोडत होणार आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून काँग्रेसच्या शांताबाई जवळगावकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. आरक्षण सोडतीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी सुटते, याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.

जवळगावकर यांच्या आधी काँग्रेसच्या मंगलाबाई गुंडले या अनुसूचित जातीतून महिला प्रवर्गाच्या आरक्षणातून जि.प. अध्यक्षा झाल्या होत्या. यानंतर पुन्हा महिलेला संधी मिळाली असून, उर्वरित 26 महिन्यांच्या कार्यकाळाची कोणाला संधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये नांदेडच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा समावेश आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी देखील नांदेडची जागा जाऊ शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Intro:नांदेड : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज सोडत.
- हवशे - गवशे - नवशे मुंबईकडे रवाना.

नांदेड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज (दि.१९) सकाळी साडेअकरा वाजता काढण्यात येणार आहे. मुंबईत मंत्रालयातील सातव्या मजल्यावर असलेल्या परिषद सभागृह क्रमांक ४ येथे ही या सोडतीचा ड्रॉ काढण्यात येईल, असे राज्य
शासनाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी कळविले
आहे. आरक्षण सोडत मुंबईला काढण्यात आल्यानंतर त्याची माहिती तत्काळ नांदेडला उपलब्ध होणार असली तरी काही हवसे, गवसे, नवसे सोमवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे. Body:
परिणामी डिसेंबरमध्ये ही मुदतवाढ संपत असल्याने आरक्षण सोडत होणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून काँग्रेसच्या श्रीमती शांताबाई जवळगावकर ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. आरक्षण सोडतीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गासाठी सुटते याकडे
राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. विविध प्रवर्गाच्या
सदस्यांनी सोडतीपूर्वीच गुडघ्याला बाशिंग बांधले
असून आपली यापदावर कशी वर्णी लागेल यासाठी
फिल्डींग लावली आहे.Conclusion:जवळगावकर यांच्या आधी काँग्रेसच्या मंगलाबाई गुंडले या अनुसूचित जाती महिला प्रवर्गाच्या पद नांदेड आरक्षणातून जि.प. अध्यक्षा झाल्या होत्या. त्यांच्यानंतर या पदाची पुन्हा महिलेला संधी मिळाली. उर्वरित २६ महिन्यांच्या कार्यकाळाची कोणाला संधी मिळेल याकडे लक्ष लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या काही जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव करायचे आहे, त्यात नांदेडचा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीदेखील नांदेडची जागा जाऊ शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.