ETV Bharat / state

सुरेखा राठोड खून प्रकरणाचा तपास कासवगतीने; कुटुंबीयांचा आरोप - सुरेखा राठोड खून प्रकरण नांदेड

किनवट शहरातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांची राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेला 23 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे वर्षभरानंतरही जप्त करण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही.

किनवट शहरातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांची राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.
author img

By

Published : Aug 26, 2019, 3:21 PM IST

नांदेड - किनवट शहरातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांची राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेला 23 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे वर्षभरानंतरही जप्त करण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही.

या घटनेचा तपास योग्य अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी मृताचे भाऊ विलास नाईक यांनी केली आहे. संबंधित घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी समाजिक संघटनांच्या वतीने मोर्चा काढल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांची बदली करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली नसल्याचा आरोप यावेळीही झाला.

किनवट शहरातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांची राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.

हे प्रकरण पुढील तपासासाठी पोलीस उप-अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे सोपवण्यात आले. मात्र, नुकतीच त्यांची बदली झाल्याने पुन्हा प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उप-अधीक्षक हसन यांच्याकडेच पुन्हा तपासाची सूत्रे देण्यात यावीत, अशी मागणी विलास नाईक यांनी केली आहे.

२३ ऑगस्ट २०१८ रोजी सुरेखा यांचा खून झाला होता. त्यावेळी कुटुंबीयांसमोर पंचनामा केल्याशिवाय मृतदेह उचलू नये, अशी विनंती विलास नाईक यांनी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना केली होती. तसेच विजय राठोड व वैशाली माने यांना अटक करण्याची विनंतीही केली होती.या विनंतीकडे पोलिसांनी दुर्लक्ष करुन स्वत: पंचनामा केला.

दरम्यान, घटनास्थळावरुन वैशाली माने फरार झाली. तसेच विजय राठोड यांचा तिसऱ्या दिवशी पीसीआर घेतला. या सर्व प्रकरणात स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

Intro:नांदेड : किनावटच्या सुरेखा राठोड खून प्रकरणाचा तपास लागेना.
- वर्ष झाले तरीही तपास गुलदस्त्यात.
- किनवट आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा तपास संशयास्पद.

नांदेड : किनवट शहरातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांचा राहत्या घरात भरदिवसा धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला काल 23 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले. स्थानिक गुन्हे शाखेला घटनेचा तपास लावण्यात अपयश आले.गुन्ह्यात वापरलेली हत्यार वर्ष झाले तरी ते जप्त करण्यात पोलिसांना यश आले नाही.Body:
या घटनेचा तपास चांगल्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावा,अशी मागणी मयताचे भाऊ विलास नाईक यांनी संबधिताकडे केली.या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी संघटना, समाजाच्या वतीने मोर्चा काढल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांची बदली करण्यात येऊन स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण तपासासाठी
देण्यात आले.मात्र पोलिसांनीही थातूरमातूर चौकशी केल्याचा आरोप नाईक यांनी केला.तथापि, हे प्रकरण
पोलीस उपअधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे देण्याची मागणी झाल्यावर हसन यांच्याकडे तपास देण्यात आला,मात्र त्यांची अलीकडे बदली झाल्याने पुन्हा प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र हसन यांच्याकडेच तपासाची सूत्रे दिली जावीत, अशी मागणी विलास नाईक यांनी पुन्हा एकदा केली आहे.Conclusion:
- २३ ऑगस्ट २०१८ रोजी सुरेखा यांचा खून झाला, तेव्हा आमच्यासमक्ष पंचनामा केल्याशिवाय मृतदेह उचलू नये,अशी विनंती विलास नाईकने पोनि विकास पाटील यांना करुन विजय राठोड,वैशाली मानेला अटक करण्याची विनंती केली होती.

- तथापि, या विनंतीकडे पोलिसांनी दुर्लक्ष करुन स्वत: पंचनामा करुन प्रेत शवगृहात हलविले.या दरम्यान घटनास्थळावरुन वैशाली माने फरार झाली. विजय राठोड यांचा तिसऱ्या दिवशी पीसीआर घेतला.एकूणच पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.