नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे शिंपाळा ( Nanded Shimpala Villagers Suffer From Diarrhea ) येथे गत तीन दिवसांपासून गावातील शंभर ते सव्वाशे गावकऱ्यांना जुलाब व उलट्यांचा त्रास होत आहे. या गावकऱ्यांवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय ( Villagers were Treated at District Hospital ) व सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात ( Health Center at Sagaroli ) आले. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आली असून, आरोग्य विभागाने गावातच ( Nanded Shimpla Villagers Diarrhea ) तळ ठोकले असून, पाण्यासह अन्य काहींचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याची माहिती डाॅ. वैभव रामपुरे यांनी दिली. सदरची घटना अन्नातून झालेल्या विषबाधामुळे घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बिलोली तालुक्यातील शिंपाळा गावात अन्नातून विषबाधा : बिलोली तालुक्यातील सगरोळी या गावापासून अगदी दोन-अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंपाळा या गावात सोमवार दि. १२ रोजी अन्नातून विषबाधा झाल्याचे समजते. यानंतर दि. १४ डिसेंबर रोजी अचानक गावातील ४६ गावकऱ्यांना पोटात दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे, उलटी व जुलाब इत्यादींचा त्रास होत असल्याने त्या गावकऱ्यांवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते.
रुग्णांवर बिलोली, नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार : यानंतर दि. १५ व १६ डिसेंबर रोजी सलग दोन दिवसांत तब्बल ८१ गावकऱ्यांना तसाच त्रास जाणवत असल्याने त्यांच्यावर नांदेड आरोग्य विभागाच्या पथकाने शिंपाळा येथे तर काही रुग्णांवर सगरोळी व बिलोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर दोन रुग्णांना उपचारार्थ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. मुले, मोठे व वयोवृद्ध गावकऱ्यांना असाच त्रास होत असल्याने नांदेड आरोग्य विभागाचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी शिवशक्ती पवार, प्रशासकीय अधिकारी डाॅ. अनिल रूईकर यांच्यासह अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिंपाळा या गावास भेट देऊन रुग्णांच्या तपासणीसह या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गावातील विविध भागांतल्या पाण्यासह इतर पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविल्याचे सांगण्यात आले.
नांदेड आरोग्य विभाग सतर्क : शिंपाळा या गावात घडलेल्या प्रकारामुळे सतर्क झालेल्या आरोग्य विभागाने गत तीन दिवसांपासून बिलोली येथील वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. कृष्णा पवार, डाॅ. राजेश आकुलवाड यांच्यावर उपचार केले, तर सगरोळी येथे डाॅ. व्ही. डी. रामपुरे, वैद्यकीय अधिकारी अरुंधती श्रीरामवार, डाॅ. व्ही. एम. माहुरे, डाॅ. विष्णू होळंबे, आरोग्य सहाय्यकतुम्मोड, कोशल्य, गायकवाड रवी, भाले व कोडामंगल सिस्टर, वाहन चालक विष्णू हे गावात तळ ठोकून आहेत.