नांदेड : बिलोली शहरापासून 1 किमी अंतरावर लिटल फ्लावर इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ एक नाला आहे. 20 जुलैला अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे रेस्क्यु करून मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. एका तासानंतर जवळपास 7 ते 8 फुट पाणी वाढले होते. जेसीबीमध्ये मुले नागरिकांना बसून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत तुडमे, सय्यद रियाज, साईनाथ शिरोळे, आचेवाड, गावंडे यांनी पाण्यात उतरून रेक्सु केले. स्थानिक नागरिकांनी एकमेकांच्या मदतीने आणि जेसीबीच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सुखरूप पाण्याबाहेर काढले.
विद्यार्थी पालक अडकले : ही खासगी शाळा पुलापलीकडे आहे. या शाळेत विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेले पालकही अचानक पाऊस वाढल्यामुळे अडकून पडले. पुलावरून पाणी जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना येता येत नव्हते. आठवड्याच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दररोज तालुक्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस पडत आहे. गुरुवारी दुपारी बिलोली, देगलूर, नायगाव, धर्माबाद, उमरी या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. धर्माबाद तालुक्यातील बनाळी गावात पाणी पातळी वाढल्याने गावाशी संपर्क तुटला आहे. येथील जवळपास 200 नागरिकांचे तालुका प्रशासनाच्या वतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत होते.
मोठ्या प्रमाणात नुकसान : बिलोली तालुक्यातील सहा मंडळातही 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडत असल्यामुळे परिसरातील लहान मोठे नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरुन ओसंडुन वाहत आहे. गंजगाव, माचनुर, कोडग्याळ, सावळी, आरळी, गावांचा बिलोलीशी संपर्क तुटला आहे. तसेच या मार्गावरील वाहतुक पूर्णत: ठप्प झाली आहे. काही ठिकाणी नाले फूटुन शेतीमध्ये पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.
पूरस्थिती निर्माण झाली : बिलोली शहरालगत सावळी गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने एका इंग्रजी शाळेतील शेकडो विद्यार्थी आणि त्यांचे पालक अडकले होते. स्थानिक नागरिकांनी एकमेकांच्या मदतीने तसेच जेसीबी मशीनच्या साहाय्याने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. तसेच बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रामतीर्थ येथे नदी आणि नाले तुडूंब भरून वाहत असल्याने शेताकडे कामासाठी गेलेले शेतकरी, जनावरे नदीच्या पलीकडे अडकली होती. त्यांना सुरक्षित ठिकाणी आण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी गावाला पूर आला होता. मुखेड, मुदखेड, भोकर या तालुक्यात रिमझिम तर, नांदेड, अर्धापूर, माहूर, किनवट, हिमायतनगर, लोहा, कंधार, हदगावमध्ये दिवभर ढगाळ वातावरण होते.
हेही वाचा :