ETV Bharat / state

अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार; नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - minor rape nanded

कॉलेजमधून नेण्यास भाऊजी आले असल्याने तरुणी दुचाकीवर बसून सोबत गेली. मात्र आरोपीने खोटे बोलून दुसरीकडे नेत तरुणीवर अत्याचार केला. पोलिसांनी तत्परतेने आरोपीला अटक केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 11, 2019, 11:59 AM IST

नांदेड - नायगाव तालुक्यात अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुकर्म करणाऱ्या भावोजीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मेहुणीला खोटे कारण सांगत महाविद्यालयातून नेऊन आरोपीने अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नायगाव पोलीस ठाणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव तालुक्यातील राहेर येथील मूळ रहिवासी असलेला आरोपी सध्या तेलंगणातील बोधन येथे सुतार काम करतो. पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीसोबत त्याचा विवाह झाला आहे. तर आरोपीची मेहुणी नायगावमध्ये तिच्या चुलत्यांकडे राहण्यास असून ती कनिष्ठ महाविद्यालात शिक्षण घेत आहे. ५ जुलैच्या सकाळी ११ च्या दरम्यान आरोपी दुचाकी घेऊन कॉलेजमध्ये मेहुणीकडे गेला. तुझे चुलते गावाला गेले असून तुला आणण्यास मला पाठवले आहे, असे खोटे कारण सांगितले.

भावोजीच असल्याने तरुणी दुचाकीवर बसून सोबत गेली. मात्र, आरोपीने तिला घरी न नेता तेलंगणातील सारंगपूर येथे व तेथून सायंकाळी त्याच्या बोधन येथील घरी नेले. तिथे पोहोचल्यावर तरुणीच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ६ जूनला तरुणीला घरी सोडले.

अत्याचार करणारा आरोपी भावोजीच असल्याने तरुणीचे कुटुंबीय हादरले. मात्र, पीडितेच्या बहिणीने अत्याचारी पतीला शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका घेऊन कुटुंबाला धीर दिला. ९ जुलै रोजी पीडितेने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परतेने आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. पाटेकर पुढील तपास करत आहेत.

Intro:नांदेड - अल्पवयीन मेव्हनीवर अत्याचार; नराधम भाऊजीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

नांदेड : नायगाव चुलते गावाला गेले असून तुला घ्यायला मला पाठवल्याचे सांगून दुचाकीवर बसवून नेऊन अल्पवयीन मुलीवर भाऊजीनेच कुकर्म केल्याची घटना घडली आहे.Body:या प्रकरणी आरोपी नराधम भाऊजीविरुध्द गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.या नराधमाला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नायगाव तालुक्यातील राहेर येथील मूळ रहिवासी असलेला आरोपी सध्या तेलंगणातील बोधनमध्ये सुतारकीचे काम करतो. पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीसोबत त्याचा विवाह झाला होता.त्याची पत्नी बाळंतपणासाठी बिलोली तालुक्यातील खपराळा येथे गेली आहे. पीडिता त्याची सख्खी मेव्हणी असून ती नायगावमध्ये
आपल्या चुलत्याकडे राहते व १२ वी शिकत आहे.
मात्र ५ जुलै रोजी सकाळी११ च्या दरम्यान तो दुचाकी घेऊन जनता ज्युनियर कॉलेज जवळ गेला व अल्पवयीन मेव्हणीला तुझे चुलते गावाला गेले असून
तुला घ्यायला मला पाठवले आहे, असे सांगितले. भाऊजीच असल्याने मेहुणीने दुचाकीवर बसून सोबत निघाली.गावाकडे जायचे म्हणून अगोदर दुगाव पाटी, कुंभरगाव महादेव मंदिर नंतर तेलंगणातील सारंगपुर व सायंकाळी बोधनमधील आपल्या खोलीवर तिला नेले.गावाकडे न जाता बिलोली कडे दुचाकी घेऊन जाताना पीडितेने त्याला विरोध केला परंतु त्याने गप्प
बस नाही तर तुझ्या बहिणीला खतम करतो अशी धमकी दिली. तसेच तोंडावर ओढणी बांधून त्याने हे कुकर्म केले आणि ६ जुले रोजी खपराळात तिला सोडून दिले.Conclusion:नराधम भाऊजीच असल्याने हे कुटुंब हादरले. मात्र पीडितेच्या बहिणीने आपल्या संसाराचे काहीही होवो पण कुकर्म करणारा हा माझा नवरा असला तरी वाईट कृत्य करण्यास शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेऊन कुटुंबाला धीर दिला. ९ जुलै रोजी पीडितेने
दिलेल्या फिर्यादी वर नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या तक्रारीवरुन गुरनं.८५,२०१९ ३७६, ३७६ (२), ३६६,५०४ व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्परतेने आरोपीला अटक केली
आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. पाटेकर पुढील तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.