ETV Bharat / state

नांदेडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या आरोपीला अटक - cheating Rs 32 lakh

नांदेडमध्ये सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपील अटक. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

भाग्यनगर पोलीस ठाणे नांदेड
author img

By

Published : Oct 7, 2019, 11:14 AM IST

नांदेड - सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ३२ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या शिक्षक दाम्पत्यापैकी पतीला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विजयकुमार उजेडे आणि महादेवी उजेडे, अशी आरोपींची नावे आहेत.

भाग्यनगर पोलीस ठाणे नांदेड

शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चिट्टे-पाटील कुटुंबाला शेजारी राहणाऱ्या उजेडे या शिक्षक दाम्पत्याने सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ३२ लाख घेतले. कालांतराने नोकरी मिळाली नाही म्हणून पैसे परत करण्यासाठी सुनंदा यांनी तगादा लावला. यानंतर संबंधित दाम्पत्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सुनंदा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात उजेडेंच्या विरोधात तक्रार दिली.

हेही वाचा - शिरूर तालुक्यातील जांबूत येथे दोन वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर हे दाम्पत्य फरार झाले होते. मात्र, काही आठवड्यांपूर्वी महादेवी उजेडे यांना अटक करून कोठडीही मिळाली होती. नंतर त्यांना रितसर जामीन मिळाला. परंतु, विजयकुमार उजेडे हे फरार होते. शनिवारी, ५ ऑक्टोबरला रात्री १२.३० वाजता विजयकुमारला नांदेडमधूनच भाग्यनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संगीता कदम, ओमप्रकाश यांनी केली. विजयकुमारला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा - दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने फेकले विहिरीत; शेलुबाजार येथील घटना

Intro:नांदेड : बत्तीस लाखांना गंडविणाऱ्या मुख्य आरोपीस पोलीस कोठडी.
नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळले.

नांदेड : नोकरीचे आमिष दाखवून ३२ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या शिक्षक दाम्पत्यापैकी पतीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १०
ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.Body:
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या श्रीमती सुनंदा चिट्टे पाटील यांच्या शेजारी राहणारे शिक्षक दाम्पत्य विजयकुमार उजेडे व
सौ.महादेवी उजेडे यांनी विश्वासात घेत तुमच्या मुलांना व नातेवाईकांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून उजेडे दाम्पत्याने तब्बल ३२ लाख रुपये उकळले आणि कालांतराने नोकरीही मिळाली नाही
म्हणून पैसे परत करण्यासाठी सुनंदा यांनी तगादा लावला असता या दाम्पत्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सुनंदा यांनी भाग्यनगर पोलीस ठाणे गाठून उजेडे दाम्पत्याविरुध्द फिर्याद दिली होती.Conclusion:त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर हे दाम्पत्य फरार झाले होते. परंतु काही आठवड्यांपूर्वी सौ.महादेवी उजेडे यांना अटक करुन कोठडीही
मिळाली होती. नंतर त्यांना रितसर जामीन मिळाला. परंतु विजयकुमार.उजेडे हा मात्र फरार होता. शनिवारी, ५ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजता विजयकुमारला नांदेडमधूनच भाग्यनगर पोलिसांनी
अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संगीता कदम, ओमप्रकाश यांनी केली.विजयकुमारला कोर्टात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक कदम यांनी दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.