ETV Bharat / state

Nanded Earthquake : नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना भूकंपाचे सौम्य धक्के; तीव्रता 3.0 रिश्टर - Pandharwadi Earthquake Epicenter

नांदेडमध्ये 3.0 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली ( Nanded Earthquake ) आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र बिंदू पांढरवाडी असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून समेर आले ( Pandharwadi Earthquake Epicenter ) आहे.

Nanded Earthquake
नांदेडमध्ये भूकंप
author img

By

Published : Dec 10, 2022, 3:43 PM IST

नांदेड : नांदेडमध्ये मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के ( Nanded Earthquake ) जाणवल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीच्या वेब साईटवर करण्यात आली आहे. 3.0 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. यात बारड, नागेली, तिरकसवाडी, शेंबोली व पांडरवाडीचा परिसर आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात रात्री बारा वाजताच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. यात कोणतीच जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती आहे.

3.0 रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता : नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीच्या वेबसाईटवर भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केलवर झाली आहे. यात बारड, नागेली, तिरकसवाडी, शेंबोली, पांडरवाडी या गावांचा परिसर भुकंपाचे केंद्र स्थान असल्याची महिती तहसिलदार सुजीत नरहरे यांनी दिली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र बिंदू पांढरवाडी असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून समजले ( Pandharwadi Earthquake Epicenter ) आहे.

भूकंप फारसा जाणवला नाही : या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केलवर असतानाही नागरिकांना या भूकंपाची फारशी जाणीव झाली नाही. याविषयी माहिती मिळताच परिसरातील नागरिकांत काहीशी घबराट निर्माण झाली आहे. तालुक्यातील विविध गावात भूकंपाचे सौम्य धक्के ( Mild earthquake tremor ) बसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या घटनेची विशेष काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.