ETV Bharat / state

विष्णुपुरी प्रकल्प १०० टक्के भरला, जलसंकट दुर झाल्याची नांदेडकरांची भावना

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने, सोमवारी दुपारी तीन वाजता विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विष्णुपुरी धरण भरल्याने नांदेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मार्गी लागल्याचे दिसत आहे.

विष्णूपुरी धरण शंभर टक्के भरले
author img

By

Published : Sep 3, 2019, 2:34 PM IST

नांदेड - गणपती बाप्पाच्या आगमनासोबत नांदेडकरांचे जलसंकट आता बऱ्यापैकी सुटल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा

विष्णुपुरी प्रकल्प संपूर्ण घरल्याने नांदेडकरांना आता आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत नांदेडकरांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या २५ ते ३० वर्षातील हि पहिलीच वेळ आहे, त्यामुळे नांदेडकर त्रस्त झाले होते.

हेही वाचा... पावसाच्या पुनरागमनाने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का...!

नांदेड जिल्ह्यात ३० ऑक्टोबरपर्यंत ५० टक्केही पाऊस झाला नव्हता. मात्र गेल्या तीन दिवसात हे चित्र बदलले आणि विष्णुपुरील प्रकल्प भरल्याने नांदेडकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. तसे पाहता यावर्षी विष्णूपुरी प्रकल्प भरणार की नाही, नांदेडकरांना पाणी मिळणार की नाही याबद्दल साशंकता होती.

हेही वाचा... मराठवाड्यावरचं दुष्काळाचं संकट दूर होऊ दे, अशोक चव्हाणांचे विघ्नहर्त्याकडे साकडे

पावसाळा सुरु होऊनही ऑगस्ट अखेरपर्यंत विष्णूपुरी प्रकल्प ५० टक्केही भरला नव्हता. जायकवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी विष्णूपुरी प्रकल्पात केवळ दहा टक्केच पोहचले. मात्र गेल्या तीन दिवसात वरील भागात तसेच धरण क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे प्रकल्प पुर्ण भरला आहे. धरण भरल्याने या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे होणारा विसर्ग आणि नदीपात्रातील परिस्थिती याचा अंदाज व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे

हेही वाचा... नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात दोन दुचाकीस्वार पूरात वाहून गेले

Intro:अखेर विष्णुपुरी प्रकल्प १०० टक्के भरला; व दोन दरवाजे उघडण्याची शक्यता....!

नांदेड:जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात चांगला पाऊस बरसला. दोन दिवस झालेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात दुपारी तीन वाजता १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मार्गी लागला आहे. शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.Body:अखेर विष्णुपुरी प्रकल्प १०० टक्के भरला; व दोन दरवाजे उघडण्याची शक्यता....!

नांदेड:जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात चांगला पाऊस बरसला. दोन दिवस झालेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात दुपारी तीन वाजता १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मार्गी लागला आहे. शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनासोबत नांदेडकरांचे जलसंकट आता बऱ्यापैकी सुटले आहे. नांदेडकरांना आता आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, मंगळवारी याबाबत निर्णय होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात ३० ऑक्टोबरपर्यंत ५० टक्केही पाऊस झाला नव्हता. मात्र गेल्या तीन दिवसात हे चित्र बदलले आणि या तीन दिवसात झालेल्या पावसामुळे नांदेडकरांनी मोकळा श्वास घेतला. यावर्षी विष्णूपुरी प्रकल्प भरणार की नाही, नांदेडकरांना पाणी मिळणार की नाही अशी अवस्था होती. सप्टेंबर अखेरपर्यंत नांदेडकरांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या २५ ते ३० वर्षातील हि पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नांदेडकर त्रस्त झाले होते.
मनपाने व काही स्वयंसेवी संस्था आणि नगरसेवकांनी वेगवेगळ्या भागात टँकरने पाणीपुरवठा करुन मे, जून, जुलै या तीन महिन्यात दिलासा दिला होता. पावसाळा सुरु होऊनही ऑगस्ट अखेरपर्यंत विष्णूपुरी प्रकल्प ५० टक्केही भरला नव्हता. जायकवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी विष्णूपुरी प्रकल्पात केवळ दहा टक्केच पोहचले. त्यामुळे ही चिंता आणखीनच वाढली. मात्र गेल्या तीन दिवसात वरील भागात तसेच धरण क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे आज दुपारी तीन वाजता विष्णूपुरी प्रकल्प १०० टक्के भरला. या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे होणारा विसर्ग आणि नदीपात्रातील परिस्थिती याचा अंदाज व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.