नांदेड Nanded Murder News : मुलीच्या जन्माचं स्वागत सगळीकडेच आनंदानं होतं असं नाही. अनेक ठिकाणी मुलीच्या जन्मामुळं तिच्या जन्मदात्या आईला, त्या नवजात बाळाला मोठी किंमत चुकवावी लागतेय. समाजात काही ठिकाणी अजूनही मुलीच्या जन्माबद्दल रोष आहे, हे नांदेड जिल्ह्यातील बोरी गावामध्ये झालेल्या हत्याकांडामुळं समोर आलंय. नांदेड जिल्ह्यात सुट्टीवर आलेल्या जवानानं गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडलीय.
गळा आवळून केली हत्या : हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. कंधार तालुक्यातील बोरी येथे हे हत्याकांड घडलंय. आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये त्याची नियुक्ती आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नी आणि चार वर्षाची मुलगी सरस्वती दोघेही झोपेत होत्या. तेव्हा त्याने त्यांची गळा आवळून हत्या केलीय. (Nanded Crime News)
पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या : पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीनं माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. दरम्यान पहिली मुलगी का झाली? माहेरून प्लॉटसाठी पैसे घेऊन ये, म्हणत त्याने पत्नीची आणि मुलीची गळा आवळून हत्या (jawan killed pregnant wife and daughter) केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलीय. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करताहेत. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या झाल्याने माळाकोळी परिसरात खळबळ उडालीय.
हत्या करण्यामागील नेमकं कारण : हत्या केल्यानंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वत: पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीनं माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीय. मयत कुटुंबाच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली. दरम्यान हत्या करण्यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलीय (Murder News).
हेही वाचा :