नांदेड - महापालिकेच्या शिक्षण, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी प्रकाशकौर सुरजितसिंघ खालसा तर उपसभापतीपदी अरशीन कौसर हबीब यांची गुरुवारी झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड झाली. पिठासीन अधिकारी अरूण डोंगरे यांनी या दोघांच्या निवडीची घोषणा केल्यानंतर, महापौरांसह अन्य पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत दोन्ही पदाधिकाऱयांनी आपला पदभार स्वीकारला.
यासमितीच्या आजपर्यंतच्या कामकाजात प्रथमच ही दोन्ही पदे अल्पसंख्यांक समुदायाकडे गेली आहेत. सकाळी दहा वाजता या दोन्ही पदाच्या निवडीसाठी विशेष सभेला प्रारंभ झाला. सभापतिपदासाठी प्रकाशकौर खालसा व उपसभापतिपदासाठी अरशीन कौसर यांचे अर्ज आले असल्याने त्याची छाननी करण्यात आली . दोन्ही अर्ज वैध ठरल्यानंतर दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केले.
या बैठकीस सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या अपर्णा नेरलकर यांच्यासह आणि सलीमा बेगम भाजपच्या शांताबाई गोरे या तीन सदस्या अनुपस्थित होत्या. जयश्री परमेश्वर पवार , सरीता बालाजीराव बिरकले, कविता संतोष मुळे, संगीता विठ्ठल पाटील, गितांजली रामदास कापूरे व चित्रा सिद्धार्थ गायकवाड हे उर्वरीत सदस्य उपस्थित होते.
प्रभारी नगरसचिव अजितपाल संधू यांनी जिल्हाधिकाऱयांना निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक ते सहकार्य केले. निवडीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यानंतर महापौर शीला भवरे, सभागृह नेते वीरेंद्रसिंघ गाडीवाले, मावळते सभापती संगीता तुप्पेकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. नूतन सभापती व उपसभापतींनी या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला. यावेळी सुरजितसिंग खालसा, करणसिंघ खालसा, अनिकेत भवरे आदी उपस्थित होते. यानंतर गुरूव्दारा बोर्ड व्यवस्थापन समितीचे नौनिहालसिंघ जागीरदार, गुलाबसिंघ कंधारवाले , रवींद्रसिंघ बुंगः यांनीही त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)