नांदेड - दोनशे खाटांच्या जिल्हा रूग्णालयाचे उद्घाटन करताना जिल्हा प्रशासनाला राजशिष्टाचाराचा विसर पडला. पालकमंत्री अशोक चव्हाण हे शासकीय इमारती स्वतःच्या खासगी मालमत्ता असल्याचे समजून उद्घाटन उरकत असल्याची टीका नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी पालकमंत्र्यांचे वागणे शब्दांत सांगणे शक्य नसल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयात दोनशे खाटांच्या सुविधांचे लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याहस्ते पार पडले. इमारतीच्या कोनशीलेवर तसेच कार्यक्रमाच्या फलकावर केवळ त्यांचेच नाव होते. तसेच कार्यक्रमाचे निमंत्रण कोणत्याही माध्यम प्रतिनिधींना दिले नाही. खासजार चिखलीकर यांना जिल्हा प्रशासनाकडून साधे फोन करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. याबद्दल नाराजी व्यक्त करून खासदार चिखलीकर यांनी जिल्हा प्रशासनाचा आपण निषेध करत असल्याचे सांगितले.
हेही वाचा - पुण्यातील 'त्या' कोरोनामुक्त चालकावर बहिष्कार, विदेशातून आलेल्या कुटुंबामुळे झाला होता बाधित
पालकमंत्र्यांनी ज्या खात्याचे पुर्वी मंत्रीपद सांभाळले तसेच राज्याचे मुख्यमंत्रीपदही उपभोगले, त्यांनी अशा लहानसहान गोष्टी करणे शोभत नाही. अशा शब्दांत त्यांनी टीकेचा वार सुरू केला. चार दिवसांपुर्वी असल्याने अनेक अधिकारी या प्रकाराला वैतागल्याचा दावा खासदार चिखलीकर यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांशी पालकमंत्री कसे वागतात, शब्दांत सांगणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले.