नांदेड : महाराष्ट्रातील एकमेव उंट खरेदी-विक्री बाजार या यात्रेत होत असतो. या यात्रेत डौलदार आणि मोठ्या संख्येने दिसत असलेले उंट पाहून हे राजस्थानातील ( Nanded Malegaon Yatra 2022 ) चित्र असेल, असे तुम्हाला वाटेल. पण, थांबा हे चित्र राजस्थानातील नाही, तर हे नांदेड जिल्ह्यातील माळेगावचे चित्र आहे. येथे महाराष्ट्रातील एकमेव ( States Only Camel Market Nanded-Malegaon Yatra ) असा उंटांच्या खरेदी-विक्रीचा बाजार ( Camel Prices Drop ) भरतो. माळेगावची यात्रा जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. आजपासून सुरू झालेल्या या यात्रेत यंदाही मोठ्या प्रमाणात उंट दाखल झाले आहेत. यंदा मात्र या उंटांच्या किमती घसरल्या आहेत. अगदी १५ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत.
महाराष्ट्रात आता उंटांचा वापर लग्नात आणि मुलांच्या हौसेकरिता महाराष्ट्रात उंटांचा वापर केवळ मोठ्या शहरांत मुलांना फेरी मारण्यासाठी होतो. लग्नात डान्ससाठीही याचा उपयोग होतो. उंटांच्या २ जाती असतात, एक कारवार अन् दुसरी देशी, उंटांना किती दात आलेले आहेत, त्यावरून उंटाचे वय ओळखले जाते. वयानुसार त्याची किंमत ठरते.
उंटांना सांभाळण्यासाठी फारसा खर्च नाही उंटांना सांभाळण्यासाठी फारसा खर्च लागत नाही, पण शोभा वाढवण्यासाठी कुणीही उंट खरेदी करीत नाही. महाराष्ट्रात उंटावरून सामान वाहून नेण्याची रीत नाही. त्याची अन्य उपयोगिता महाराष्ट्रात नसल्याने इथे उंटांच्या किमती मात्र घसरल्या आहेत. आज जुनी मोटार-सायकल खरेदी करायची म्हटले तरी ५० हजार रुपये लागतात, पण उंट खरेदीसाठी मात्र त्याहून कमी पैसे मोजावे लागतात.