नांदेड : राज्यात ४८ पैकी १३ लोकसभा मतदारसंघात (Nanded Lok Sabha Constituency) भाजपचा उमेदवार पुन्हा निवडून येईल की नाही, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच साशंकता आहे. त्यात मराठवाड्यातील चार मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघही त्यात समाविष्ट आहे. हे १३ मतदारसंघ भाजप सर्वाधिक फोकस केला (BJP Lok Sabha Objectives) आहे. जिल्ह्यातील भाजपची एकूणच श्रेष्ठींच्या डायरीत नोंद असून, त्यावर स्थिती पाहता भाजप श्रेष्ठींना वाटणारीचिंता रास्त आहे. (BJP Lok Sabha Election Preparations) जिल्ह्यात भाजपचे भाजपची संघटनात्मक व एकूणच राजकीय बांधणी खिळखिळी (Loksabha Election Nanded) झाल्याचे खासदार, तीन आमदार व एक विधान परिषद सदस्य आहेत. परंतु त्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने आहेत. (Nanded Loksabha Seat in danger zone)
पक्षमजबुतीकडे दुर्लक्ष : या सर्वांना एकाच व्यासपीठावर पाहण्याचा क्षण दुर्मिळ ठरतो. खासदार-आमदारांतील गटबाजीमुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांना फारसा 'व्हॉइस' नाही. शहराध्यक्ष खासदारांच्या 'गुडबुक'मध्ये आहेत. सहसा आंदोलनांच्या वेळी कार्यकर्त्यांना त्यांचे दर्शन होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची फारसी ताकद नाही. एका आमदाराला तर आपल्या गावच्या नगरपंचायतीत भोपळाही फोडता आला नाही. अशीच कमी-जास्त अवस्था भाजपची जिल्हाभरात आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यावर प्रमुख लोकप्रतिनिधींनी फारसे लक्ष दिले नाही. काँग्रेस व अशोकराव चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेण्यातच खासदारांची एनर्जी खर्चीमंजुरीच्या तेवढ्या घोषणा पडत असल्याचे दिसते. विकासाच्या बाबतीतही बोंबाबोंब आहे. कामांच्या पत्रपरिषदांमधून केल्या जात आहेत. केंद्रातून एकही मोठा प्रकल्प जिल्ह्यात आला नाही.
काँग्रेसकडून लोकसभा कोण लढविणार?
भाजपच्या काहीशी उलट स्थिती जिल्ह्यात काँग्रेसची आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने व्यापक नियोजन करून तशी तयारीही सुरू केली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील एन्ट्री नांदेडमधून झाली. या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. या यात्रेमुळे काँग्रेसचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे चार्ज झाले आहेत. त्याचा फायदा पक्षाला स्थानिक निवडणुकांमध्ये नक्कीच होईल, असे मानले जाते.
काँग्रेसकडून लोकसभा कोण लढविणार?
काँग्रेसकडून लोकसभा कोण लढविणार हे अद्याप स्पष्ट नाही. नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस परिपक्च चेहरा देईल की तरुणाईला संधी देईल हे वेळच सांगेल. मात्र, त्या अनुषंगाने अनेक नावांची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात होताना दिसते आहे.
खासदार हेमंत पाटील व आमदार शिंदे गटाची साथ भाजपला तारणार?
नांदेड जिल्ह्यातील भाजपची ही एकूणच अवस्था लोकसभा निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठींना चिंतेत टाकणारी आहे. भाजप कुणाच्या बळावर निवडून येणार हा प्रश्नच आहे. शिवसेनेच्या शिदे गटाची साथ मिळेल ही एकमेव आशा आहे. बालाजी कल्याणकर शिदे गटात गेले. कल्याणकरांचा साधेपणा अपील झाल्याने मतदारांनी त्यांना २०१९ ला निवडून दिले. मात्र त्यांच्याबाबत आता तशी स्थिती नाही. कल्याणकर आता तेवढे साधेभोळे राहिले नसल्याची जाणीव मतदारांना झाली आहे.
अर्थकारणावरून चर्चा : 'अर्थ' कारणाचीही मतदारसंघात आता खुली चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे कल्याणकरांचा भाजपला नेमका किती फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या मतदारसंघातील आमदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांनी सुरतमार्गे गुवाहाटीची वाट धरली. यामुळे मतदार नाराज आहेत.
भाजपपुढे दोनच पर्याय : शिवसेनेतून एकनाथ शिंदे वेगळे निघाले असले तरी सामान्य जनतेची व निष्ठावान शिवसैनिकांची सहानुभूती मात्र अद्यापही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आहे. अशा स्थितीत केवळ नरेंद्र मोदीच्या नावावर नांदेड लोकसभा मतदारसंघाचा गड सर करणे शक्य होईल का, याबाब भाजप श्रेष्ठी साशंक आहेत. अशावेळी आतापासून मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करणे किंवा ऐनवेळी चेहरा बदलविणे हे दोन पर्याय भाजपपुढे दिसतात. या पुढील काळात भाजप श्रेष्ठींचा फोकस लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णतः नांदेडवर राहणार एवढे निश्चित.