ETV Bharat / state

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पराभूत, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी

भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.

अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर
author img

By

Published : May 23, 2019, 6:01 AM IST

Updated : May 23, 2019, 11:34 PM IST

नांदेड - भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, मोदी लाट असतानाही काँग्रेसची नाव चव्हाण यांनी तिराला लावली होती. मात्र आता काँग्रेसच्या याच बालेकिल्ल्याला भाजपने भगदाड पाडले आहे. चिखलीकर यांच्या विजयानंतर त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्याची मोठा जल्लोष केला.

भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर
  • महत्वाच्या घडामोडी -
  • 11.55 am - भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर २४ हजार ८१६ मतांनी आघाडीवर.
  • 10.45 am - १८ व्या फेरी अखेर भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांना ९२ हजार २५९ हजार मतांसह आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना ८० हजार ६२१, तर वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना २९ हजार ९०५ मते मिळाली आहेत.
  • 10.17 am - बाराव्या फेरी अखेर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर ६२ हजार २३६ मतांसह आघाडीवर. काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना ५४ हजार ७०० मते. तर वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगेंना १७ हजार ३३६ मते.
  • 10.02 am - सातव्या पेरीत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर ३४ हजार ७७८ मतांसह आघाडीवर. तर आशोक चव्हानांना २६ हजार ४७२ मते
  • 9.47 am - सहाव्या फेरीत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर २३ हजार ४२० मतांसह आघाडीवर
  • 9.46 am - सहाव्या फेरीत काँग्रेसचे विद्यमान खासदार अशोक चव्हान ६ हजार ११६ मतांनी मागे
  • 9.45 am - वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगारेंना ५ हजार ४७० मते
  • 9.06 am - अशोक चव्हाण 2 हजार 223 मतांनी पिछाडीवर
  • 8.15 am - अशोक चव्हाण आघाडीवर
  • 8.00 am - मत मोजनीला सुरुवात. सर्वप्रथम पोस्टल, नंतर व्होटींग मशीन आणि सर्वात शेवटी, नांदेड मधील प्रत्येक विधानसभा मतदार संघातून सोडत चिटीने पाच मतदान केंद्र निवडून व्हिव्हिपॅटची मतमोजणी होणार.

नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण ६५.१५ टक्के मतदान झाले होते. यावेळी येथून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपा-सेना युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत किरकोळ कमी-जास्त मताधिक्य झाले. पण प्रताप पाटील चिखलीकर हे आघाडीवर राहिले. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने बरीच मते घेतली. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला.

उमेदवारांना पडलेली मते -
प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप)-458416
अशोकराव चव्हाण (काँग्रेस)-422170
प्रा. यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी)-159330
शिल्लक मतदान: 51196

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 11:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.